दुर्गम भागाला अजूनही नाही नवी बोट ; या माजीमंत्र्याने प्रशासनाकडे दाखवले बोट
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन मुळा धरण परिसरातील वावरथ, जांभळी येथील रहिवाशांच्या दळणवळणाशी आणि सुरक्षिततेशी संबंधित अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर चर्चा केली .
माजी मंत्री तनपुरे यांनी म्हटले की , मुळा धरणातील प्रवासी बोट नादुरुस्त झाली आहे. मी आमदार असताना नवीन बोटीसाठी सुमारे १ कोटी रुपये मंजूर केले होते. त्या नवीन बोटीचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. ठेकेदारकडे तातडीने पाठपुरावा करून ती बोट उपलब्ध करून द्यावी. तोपर्यंत जुनी बोट दुरुस्त करून द्यावी अशी मागणी केली.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने सकारात्मक पावले उचलण्याचे आश्वासित केले.
यावेळी वावरथचे माजी सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास बाचकर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments