मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) चे उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा ; टाकळीमियाच्या डीपीसाठी शाम काका निमसे यांनी केला पाठपुरावा
राहुरी ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्हा विकास निधीतून व जिल्ह्याचे युवा नेते मा. खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली
व डॉ. बा.बा.तनपुरे स.साखर कारखान्याचे मा.उपाध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरीचे संचालक व मियासाहेब पतसंस्थेचे चेअरमन श्री शामकाका निमसे यांच्या पाठपुराव्यानुसार टाकळीमिया(तनपुरे मळा) येथे मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मर (डीपी) चे उद्घाटन तथा लोकार्पण सोहळा सन्माननीय श्री शामकाका निमसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
यावेळी टाकळीमिया गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ लीलाताई गायकवाड,मा.सरपंच श्री ज्ञानदेव निमसे, प्रतिष्ठित उद्योजक श्री राजू अण्णा गायकवाड,भाजपाचे सरचिटणीस श्री संदिप विधाटे,श्री प्रताप निमसे,श्री शहाजी म्हसे,श्री जिजाबा चिंधे,श्री बाळासाहेब तनपुरे, श्री रामदास तनपुरे, श्री विठ्ठल तनपुरे,श्री हौशिनाथ तनपुरे,श्री चांगदेव तनपुरे,श्री उत्तमराव वाघ,श्री बाळासाहेब भालेराव, सचिन तनपुरे, दत्ता तनपुरे, अनिल तनपुरे, सोमनाथ तनपुरे, महेश तनपुरे यांच्यासह आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
.jpg)

.jpg)
Post a Comment
0 Comments