🟩 नगर जिल्ह्यातील साडेआठ लाख शेतकऱ्यांना भरपाई
📍 अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाचा निर्णय – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
💬 जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिलेली माहिती
अहिल्यानगर ( प्रतिनिधी )
👉 यावर्षीच्या अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात शेती, पशुधन आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
👉 जिल्ह्यातील ८ लाख ४९ हजार ७१६ शेतकऱ्यांना एकूण ₹८८०२३.६६ लाख रुपये (म्हणजेच सुमारे ₹८८०.२३ कोटी) भरपाई मंजूर.
👉 बँकांनी ही भरपाई रक्कम कर्ज किंवा अन्य खात्यात हस्तांतरित करू नये; अन्यथा आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये कारवाई होणार आहे.
🏠 घरांची पडझड (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर)
🟢 एकूण – ५,६९७ घरे
🔹 पाथर्डी – १,०२०
🔹 शेवगाव – ९२१
🔹 जामखेड – ९०६
🔹 नगर – ५२२
🔹 नेवासा – ५६५
🔹 राहुरी – ३९६
🔹 संगमनेर – २२७
🔹 राहाता – २०३
(इतर तालुके : अकोले, कर्जत, कोपरगाव, पारनेर, श्रीगोंदे, श्रीरामपूर)
🐄 जनावरे व कुक्कुटधन हानी
🔸 १,०५९ जनावरे दगावली
🔸 १३,८७९ कोंबड्या मृत
🔸 आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
🌾 ५.७६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
📍 १४ तालुक्यांतील १,३११ गावांवर अतिवृष्टीचा फटका


Post a Comment
0 Comments