तालुका क्रीडास्पर्धांत महेश मुनोत विद्यालयाचे दैदीप्यमान यश
राहुरी ( प्रतिनिधी )
तालुक्यातील वांबोरी येथील अ. ए. सो. च्या महेश मुनोत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कुस्ती, बुद्धिबळ, तायक्वांदो, धावणे, लांबउडी, गोळा फेक,थाळीफेक ,रिले आदी खेळ प्रकारांत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.
युवक क्रीडा संचालनालय,महा.राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच राहुरी तालुका क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, कृषी विद्यापीठ राहुरी येथे या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. सर्व यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे अ.ए.सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व शाळा समितीचे चेअरमन हेमंत मुथा यांनी खास अभिनंदन केले. प्रशालेतील तब्बल ६५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यशप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रशालेचे चेअरमन हेमंत मुथा, प्राचार्या शुभांगी देशपांडे, उपप्राचार्य बाळासाहेब वाबळे व पर्यवेक्षक निलेश भालेराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या अद्वितीय अशा यशाचे मानकरी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा अध्यापक बाबासाहेब पटारे, संजय विटनोर व वैभव चोथे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रशालेतील मुलांनी ५ सुवर्णपदके तर मुलींनी २२ सुवर्णपदके मिळवून एकूण २७ सुवर्णपदके विद्यार्थ्यांनी मिळवली.रौप्यपदके ८ मुलांनी जिंकली तर मुलींनी १४ रौप्यपदके जिंकून आणली.विद्यार्थ्यांनी एकूण २२ रौप्यपदके जिंकून आणली.रजत पदके ८ मुलांना मिळाली तर मुलींनी ८ रजत पदके मिळवली.एकूण १६ विद्यार्थी रजतपदक मानकरी ठरले.
१४ वर्षे वयोगट-
वेदिका साळुंके (१००,६०० मी. धावणे प्रथम व लांब उडी प्रथम) गौरी राऊत (६००मीटर धावणे द्वितीय.)
१७ वर्षे वयोगट-
गायत्री तोडमल (१००,२००मीटर धावणे प्रथम)
४×१००मी. रिले प्रथम) व्यवहारे शिवानी ४×१००मी. रिले प्रथम
पाडळे साक्षी(४×१००मी. रिले प्रथम),पादर गौरी(८०० मी. धावने प्रथम, ४×१००मी. रिले प्रथम) थिटे पूजा (४×१००मी. रिले प्रथम), जवरे प्रियांका (४×१००मी. रिले द्वितीय), कुसमुडे समृद्धी (४×४०००मी. रिले द्वितीय), पुंड दुर्वा(थाळी फेक तृतीय)
१९ वर्षे वयोगट:
गायत्री निकम(४×१००मी. रिले प्रथम)
पवार तन्वी(१०० मी. तृतीय)
मोरे निकिता(४×१००मी. रिले तृतीय)
नवले मोहिनी (४×१००मी. रिले द्वितीय)
पेहेरे भारती (४०० मी. धावणे,४×४००मी. रिले प्रथम)
साळुंके दिव्या (८००मी. धावणे व ४×४००मी. रिले प्रथम)
धुमाळ साक्षी (४×४००मी. रिले प्रथम)
ठुबे कीर्ती (४×४००मी. रिले प्रथम)
भांबळ अपेक्षा(४×४००मी. रिले प्रथम)
विद्यार्थ्यांनी स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत निकराची झुंज दिली. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या अभूतपूर्व व नेत्रदीपक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


Post a Comment
0 Comments