Type Here to Get Search Results !

राहुरी पालिका निवडणूक : नगराध्यक्षपदाचा एक तर नगरसेवकपदासाठी 23 अर्ज बाद

राहुरी पालिका निवडणूक : नगराध्यक्षपदाचा एक तर नगरसेवक पदासाठी 23 अर्ज बाद



राहुरी   ( विशेष वृत्त )

          राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या आज छाननीत नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी चे 23 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत .



राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या एक तर नगरसेवक पदाच्या 24 जागांसाठी दोन डिसेंबरला मतदान होत आहे . सोमवारी शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज तर 24 सदस्यांसाठी तब्बल 170 अर्ज दाखल झाले होते .



आज झालेल्या छाननीत नगराध्यक्ष पदासाठीच्या एक अर्ज बाद झाला तर नगरसेवक पदासाठी चे 23 अर्ज बाद झाले आहेत . दुपारपर्यंत छाननीची ही प्रक्रिया सुरू होती . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , आता नगराध्यक्ष पदासाठी 11 उमेदवार आणि बारा प्रभागातील 24 सदस्य साठी 147 उमेदवार पात्र ठरले आहेत .

 नगर जिल्ह्यातील 14 नगरपालिका च्या नगराध्यक्ष पदासाठी 30 उमेदवार अपात्र तर सदस्य पदासाठी 331 उमेदवार पात्र ठरले असून नगराध्यक्ष पदासाठी 105 पात्र तर 1218 उमेदवार पात्र ठरल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे .

Post a Comment

0 Comments