साई आदर्श मल्टीस्टेटकडून छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयाला डिजिटल बोर्ड भेट
राहुरी फॅक्टरी ( प्रतिनिधी )
येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेने सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून एक प्रशंसनीय उपक्रम राबवत छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयास अत्याधुनिक चार डिजिटल बोर्ड भेट दिले.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अधिक परिणामकारक पद्धतीने वाढावे, शिक्षण अधिक आकर्षक आणि समजण्यास सोपे व्हावे, यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
यावेळी बोलताना साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले आजच्या डिजिटल युगात मुलांना पारंपरिक शिक्षणाबरोबरच स्मार्ट शिक्षणाची साथ मिळणे अत्यंत आवश्यक झाले आहे.याच गरजेला प्रतिसाद देत साई आदर्श मल्टीस्टेटने ही महत्त्वाची सुविधा उपलब्ध केली असून डिजिटल बोर्डच्या माध्यमातून शिक्षकांना विषयांचे सादरीकरण सुलभ होणार आहे.
यावेळी श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे, डॉ.तनपुरे कारखान्याचे संचालक अशोक उऱ्हे, विष्णुपंत गीते, किशोर थोरात, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, दत्तात्रय गोपाळे, मॅनेजर सचिन खडके, योगेश आंबेडकर सर, सुजित गवळी, मुख्याध्यापीका चोखर मॅडम आदींसह शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी ज्ञानदेव कोळसे म्हणाले साई आदर्श नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर राहिली आहे. अर्थ कारना बरोबर शिवाजीराव कपाळे यांचे सामाजिक काम वाखाण्याजोगे व इतरांनी त्यांचा आदर्श घेण्या जोगे आहे.
या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका चोखर मॅडम यांनी साई आदर्श मल्टीस्टेटचे आभार व्यक्त करत संस्था सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात योगदान देत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशमुख सर यांनी केले.


Post a Comment
0 Comments