Type Here to Get Search Results !

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निवडणूक प्रभारी जाहीर ; राहुरीसाठी पहा कोण....

उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे निवडणूक प्रभारी जाहीर ; राहुरीसाठी पहा कोण....



 राहुरी ( प्रतिनिधी )

         उपमुख्यमंत्री  एकनाथ  शिंदे यांच्या  नेतृत्वाखालील शिवसेनेच्या  निवडणूक  प्रभारी पदांवरील  नियुक्ती जाहीर करण्यात आल्या असून  राहुरी  व  देवळाली प्रवरा  नगरपालिका निवडणुकी साठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ प्रभारी म्हणून जाहीर करण्यात आले आहेत .



वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आगामी



स्थानिक स्वराज्य संस्था - नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने 'निवडणूक प्रभारी' पदांवर नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

          यात प्रामुख्याने नगर जिल्ह्यातील राहुरी नगरपालिकेसाठी संगमनेर येथील आमदार अमोल खताळ यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे . तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेसाठी देखील आमदार अमोल खताळ यांच्यासह माजी खासदार सदाशिव लोखंडे , माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्याही प्रभारी म्हणून नियुक्ती जाहीर झाले आहेत . 

Post a Comment

0 Comments