Type Here to Get Search Results !

राजूभाऊ शेटे यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश ; निवडणुकीची जबाबदारी राजूभाऊ शेटे व तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्याकडे

राजूभाऊ शेटे यांचा उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश ; निवडणुकीची जबाबदारी राजूभाऊ शेटे व तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्याकडे



राहुरी तालुक्यातील राजकारण फिरणार ?


राहुरी  ( प्रतिनिधी ) 

           राहुरी तालुक्यातील धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष रामचंद्र उर्फ राजूभाऊ शेटे पा. यांचा बुधवार दि. १२ रोजी मुंबई


 


येथे  उपमुख्यमंत्री  तथा शिवसेना  पक्षाचे मुख्य नेते नाम. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत  शेकडो  कार्यकर्त्यांसह   प्रातिनिधिक  स्वरुपात  प्रवेश करण्यात  आला .



या प्रसंगी शिवसेना पक्षाचे प्रवक्ते इजी.संजिव भोर,जिल्हा प्रमुख दक्षिण बाबुशेठ टायरवाले,शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, युवा सेना तालुका प्रमुख सचिन करपे यांसह शिवसेना पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.


राहुरी येथिल युवा नेते राजूभाऊ शेटे पा.यांचा नाम.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश होणार कि नाही यावर चर्चा रंगल्या होत्या. विधासभा निवडणुकीत देखील श्री.शेटे पा.यांनी महायुतीचे उमेदवार कै.आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचार दौऱ्यात नाम.एकनाथ शिंदे यांचा कार्यकर्ता म्हणून सक्रीय नोंदवला होता. त्याच बरोबर राहुरीच्या डॉ . तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सर्वसामान्य ऊस उत्पादक यांना सोबत घेवून शेतकरी विकास मंडळ स्थापन करून पहिल्यांदाच लढवली होती. कुठल्याही मोठ्या निवडणुकीचा अनुभव नसताना देखील कारखाना निवडणुकीत तुल्यबळ लढत दिली होती.या निवडणुकीत राजकीय पक्षाची साथ असते तर कारखाना निवडणुकीचा निकाल हा वेगळा लागला असता अशी प्रतिक्रिया तालुक्यातून येत होती.


श्री.शेटे यांच्या शिवसेना प्रवेशादरम्यान नाम.एकनाथ शिंदे यांनी स्वागत करतांना सांगितले कि “राजूभाऊ यांच्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना पक्षाची ताकद वाढणार आहे , याचा आगामी निवडणुकांमध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फायदा होईल.”


याच पार्श्वभूमीवर आगामी जिल्हापरिषद,पंचायत समिती व राहुरी नगरपालिका निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या आग्रहाने श्री.राजूभाऊ शेटे पा.यांनी काल बुधवारी अचानक मुंबई येथे निवडक शेकडो कार्यकर्त्यांसह नाम.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे.श्री.शेटे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी विधासभा पोट निवडणुकीत काय चित्र बदलते ? याकडे सर्वांचे लक्ष लागले.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री.शेटे पा.यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशामुळे तालुक्यातील हजारो तरुणांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

श्री.राजूभाऊ शेटे पाटील यांनी राहुरी तालुक्यात गाव तिथे शिवसेनेची शाखा हा उपक्रम हाती घेणार असल्याचे म्हंटले आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नाम.एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून बळ देण्याचा मानस व्यक्त केला आहे.

या प्रसंगी मुंबई येथे धनंजय घुगरकर, ज्ञानेश्वर टेकाळे, सतिष बोरुडे, अॅड भाऊसाहेब पवार, वळण सोसायटीचे चेअरमन उमेश खिलारी, चंद्रकांत आढाव,मा. सरपंच सुभाष जुंदरे, संदीप थोपटें, मनोज खुळे, शामराव तोडमाल, शामराव ढोकणे, संदीप आढाव, योगेश नाळकर, शरद डुक्रे, संदीप बोरूडे, आकाश हारदे,संतोष धसाळ, राधु जाधव, सर्व्हेश कानडे, राहुल तमनर, बाळासाहेब वाघ, नदीम शेख, नारायण घाडगे, रामदास नाळकर, महेश शेळके, गणेश खिलारी, अक्षय शेरमाले, सतीश ढवळे, अमोल काल्हापुरे, ज्ञानेश्वर डांगे, गोटू सूर्यवंशी,नारायण घाडगे, आदींसह बहुतांशी कार्यकर्ते उपस्थित होते.


चौकट - नुकत्याच झालेल्या राहुरी येथील बैठकीदरम्यान माखा सदाशिव लोखंडे व शिवसेना जिल्हाप्रमुख दक्षिण बाबुशेठ टायरवाले यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जबाबदारी राजूभाऊ शेटे व शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांच्याकडे दिली आहे.

Post a Comment

0 Comments