Type Here to Get Search Results !

लोणी येथे प्रभूमिलन भवनाचे उद्या लोकार्पण

लोणी येथे प्रभूमिलन भवनाचे उद्या लोकार्पण

 


लोणी ( वार्ताहर ) :

 ज्ञानेश्वर साबळे

राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे ब्रह्माकुमारीज प्रभूमिलन भवनाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

   शनिवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व ब्रम्हाकुमारीजच्या क्षेत्रीय प्रभारी राजयोगिनी संतोष दीदी, सब झोन प्रभारी राजयोगिनी सुनंदा दीदी,मीरा सोसायटी संचालिका राजयोगिनी नलिनी दीदी यांच्या हस्ते या भवनाचे लोकार्पण होणार आहे.



यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील,प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील,रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील,लोणी बुद्रुकच्या सरपंच कल्पना मैड,खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे पाटील, ब्रह्माकुमार भानुप्रकाश भाई,राजयोगिनी उषा दीदी, ब्रह्माकुमार दशरथ भाई,राजयोगी राजेश भाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    लोकार्पणानंतर ओम गुरुदेव मंगलकार्यालयात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ओम शांती केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments