उद्योजक विजय सेठींकडून डाॅ.तनपुरे कारखान्यासाठी एक कोटींचा धनादेश !
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी येथील डाॅ.बाबुराव बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखाना हे आमचे कुटुंबिय आहे,आमचे बालपण येथे गेले या कारखाण्याचे गतवैभव आम्ही बघितले होते, गेलेले गतवैभव परत मिळावे अशी आमच्या वडिलांची इच्छा होती, म्हणून आज आम्ही "एक कोटी" रूपयांची मुदत ठेव देत आहोत,
आपण या कारखान्याचे गतवैभव परत मिळवून द्या, आम्ही निस्वार्थ तुमच्या बरोबर आहोत, अशी भावनिक साद उद्योजक विजय सेठी यांनी घातली.
रविवारी सायंकाळी राहुरी येथील उद्योजक विजय सेठी यांच्या निवासस्थावर डाॅ.तनपुरे कारखाण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष अरूण तनपुरे यांच्याकडे एक कोटी रूपयांची मुदत ठेवीची धनादेश सुपुर्त करत सर्वांनाच एक सुखद धक्का दिला आहे.
आमचे वडील येथे कपड्यानिशी आले होते, तनपुरे कुटुंबीय आमचे पालक होते, त्यामुळे या कारखान्याचे गतवैभव आम्ही बघितलेले आहे,माञ आहे याची अवस्था बघुन खुप दुखः होते, म्हणून आम्ही भुमिपुञाने मागितले नाही पाहीजे ,तर दिले देखील पाहीजे या भावनेतुन हा खारीचा वाटा उचलला असल्याचे सेठी यांनी सांगितले,,,,, प्रसंगी हा धनादेश स्विकारताना कारखाण्याचे अध्यक्ष अरूण तनपुरे हे भावनिक झाले. राहुरीतील सर्वच उस उत्पादन शेक-यांच्या वतीने त्यांनी सेठी परीवराचे आभार मानले.
प्रसंगी संजय सेठी, बादल सेठी, साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, जोगिंदर कथुरीया, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक त्रिभुवन,ऋषभ लोढा,साई समाधानचे दत्तात्रय दरंदले,प्रशांत वाबळे,प्रकाश सोनी,डॉ.संदीप मुसमाडे,नंदू मोरे,रामेश्वर तोडमल,सुरेश नागपाल,अनिल इंगळे,रमेश दुधाडे,दत्तात्रय साळुंके,सतीश कुलकर्णी, कुंदन शर्मा,नितीन डमाळे,साई त्रिभुवन आदिंसह मान्यवर उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments