राहुरीत मतदान जागृतीसाठी आयोजित रांगोळी स्पर्धेला उदंड प्रतिसाद
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पारदर्शक, शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक मतदानासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने SVEEP अंतर्गत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .
या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा, खुला गट मधून, बचत गट सदस्यांचा, तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी एकूण 100 विद्यार्थी व 20 महिला भगिनींनी भाग नोंदवला.
निवडणूक निर्णक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अनुपसिंह यादव यांच्या आदेशानुसार , सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार नामदेव पाटील ,
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली , SVEEP - मतदान अंतर्गत जनजागृती अंतर्गत , राहुरी नगरपरिषद ,
निवडणूक -२०२५ अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते .
यात , रांगोळी , चित्रकला , निबंध ,
मतदान जनजागृती साठी रील्स इ. जन जागृती साठी , पथनाट्य , रॅली , प्रभात फेरींचे आयोजन करण्यात आले होते . विविध
स्पर्धामध्ये भाग पहिल्या तीन क्रमांकांना नगरपालिकेतर्फे प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे .याचाच एक भाग म्हणून दि. २०/११/२०२५ रोजी केशर मंगल कार्यालय, राहुरी येथे रांगोळी स्पर्धा पार पडली. राहुरी नगरपरिषद मुख्याधिकारी प्रियंका शिंदे, प्रशासकीय अधिकारी रामदास म्हस्के, राहुरी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे,
तसेच राहुरी नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी शिवाजी कराड, यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचे मनोबल वाढवले व स्पर्धकांचे कौतुक केले.
स्पर्धेचे सूत्रबद्ध नियोजन SVEEP-रांगोळी स्पर्धा नोडल अधिकारी मनिषा गिरी व कावेरी भगत यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. भागीरथीबाई तनपुरे कन्या, माध्य, विद्यालयाच्या श्रीमती आढाव मॅडम व विद्या मंदिर शाळेचे समीर शेख यांनी काम पाहिले.
रंगांच्या माध्यमातून मतदानाचा मूल्यवान संदेश देणारी ही स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली. SVEEP अंतर्गत मतदान जनजागृती साठी नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता वाढविण्याचा उद्देश या उपक्रमातून प्रभावीपणे साध्य झाला.










Post a Comment
0 Comments