राहुरीपालीका निवडणूकीची रणधुमाळी सुरु : विकास आघाडीच्या उमेदवारांचा आज फुटणार प्रचाराचा नारळ
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरीत आज कासार गल्लीतील प्रसिद्ध गणेश मंदिरात विकास आघाडीच्या उमेदवारांचा नारळ सकाळी साडेनऊ वाजता
नेते व मतदारांच्या उपस्थितीत फूटणार आहे .
राहुरी नगरपरिषद ची निवडणुक २ डिंसेबर २०२५रोजी होत आहे. सदर निवडणुक साठी राहुरी शहरातील वॉर्ड क्रंमाक ०६ मधुन दोन्ही उमेदवार निवडणुक लढवित आहेत.
त्यानिमित्ताने २१ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता प्रचार नारळ फोडण्यासाठी गणेश मंगल कार्यालय जवळ , कासार गल्ली , राहुरी येथे उपस्थित रहावे तसेच प्रचार फेरी साठी मतदार बंधु व सर्व स्नेही तसेच मित्र परिवारानी उपस्थित रहावे , असे आवाहन संजीव सुधाकर उदावंत ( ६ ब ) आणि सौ . माधुरी अनिल माळी ( ६ अ ) यांनी केले आहे.
दरम्यान , राहुरी नगरपरिषदेच्या २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकीतून नगराध्यक्ष पदाचे अनुसूचित जमातीच्या १ उमेदवाराने तर नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारपैकी २ महिलांनी आपले ३ अर्ज मागे घेतल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी दिली.
राहुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी आज नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केलेल्या राहुल अशोक बर्डे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या पैकी १)सौ गयाबाई अरुण ठोकळे यांनी प्रभाग क्रमांक ४ ब मधील (सर्वसाधारण महिला) व प्रभाग ११अ मधील (अनुसूचित जाती महिला )अर्ज मागे घेतले.२)विद्या दिपक साळवे यांनी प्रभाग १२ ब मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे (सर्वसाधारण महिला )भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला.



Post a Comment
0 Comments