Type Here to Get Search Results !

ओबीसी हक्क परिषद नवी दिल्लीच्या श्रीमती सारिका चंद्रकांत नागरे राज्य उपाध्यक्षपदी यांची निवड

 ओबीसी हक्क परिषद नवी दिल्लीच्या श्रीमती सारिका चंद्रकांत नागरे राज्य उपाध्यक्षपदी यांची निवड



 लोणी  ( प्रतिनिधी )  ज्ञानेश्वर साबळे

ओबीसी हक्क परिषद नवी दिल्ली या संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी श्रीमती डॉ, सारिका चंद्रकांत नागरे यांची निवड करण्यात आली असल्याचे गुरुवर्य डॉ, श्री प्रदीप बाबुराव फाले ओबीसी नेते संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी कळविले आहे .




 याबाबत प्रसिद्धस दिलेल्या पत्रात गुरुवर्य डॉ, प्रदीप बाबुराव फाले संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी हक्क परिषद यांनी म्हटले आहे की ,  श्रीमती सारिका ताई नागरे यांचे सामाजिक क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे व संघटनेच्या माध्यमातून शोषित , वंचित व अन्याय अत्याचाराला संस्थेच्या माध्यमातून सोडविण्याचे त्यांचे सर्वात मोठे योगदान आहे .  त्यातच त्यांना हे पद मिळाल्याने ते ह्या ओबीसी हक्क परिषदेच्या माध्यमातून ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढण्याचा प्रयत्न करतील .   

 राष्ट्रीय प्रसिद्धी प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते रवी शेठ माळवे यांनी सांगितले की , ताई या पदाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा सोबत सदैव असेल व आपल्या संघटनेच्या माध्यमातून अन्याय अत्याचार या विरुद्ध संघटना सदैव काम करीत राहील असे ते पत्रकारांशी बोलले .  सदस्य गोकुळ शेठ चिंतामणी, मेजर शेवंते, अशोक काका मैड, प्रकाश मैड, सोमनाथ आहेर, श्रीपाद बोकंद, तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर सोनवणे, अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे , साई सुवर्ण बहुउद्देशीय सेवाभावी सर्व सदस्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या .

Post a Comment

0 Comments