Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आजी माजी खासदार समर्थकांची चांगलीच चढाओढ

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आजी माजी खासदार समर्थकांची चांगलीच चढाओढ

राहुरी ( प्रतिनिधी )

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आजी माजी खासदारांच्या समर्थकांची चांगलीच चढाओढ सध्या सोशल मिडियावर दिसून येत आहे .

 दोघांचे ही व्हिडिओ व्हायरल होत असल्याने चर्चांना ऐन पालीका निवडणूकीत उधाण आले आहे .

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० नगर - राहुरी - शिर्डी - कोपरगाव या महामार्गाचे गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या कामामुळे जिह्याची अब्रूच चव्हाट्यावर आलेली होती .



खासदार निलेश लंके यांचा व्हायरल व्हिडीओ


सध्या याच महामार्गाचे ऐन पालिका निवडणूकीच्या काळात वेगाने काम सुरु आहे .

कालच सध्याचे शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके राहुरीत येऊन या महामार्गाची पाहणी करून संबंधित NHAI च्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या .



माजी खासदार डॉ सुजय विखे यांचा व्हायरल व्हिडीओ


या वेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे त्यांच्या सोबत होते . 

खा खासदार लंकेंच्या राहुरीतील रस्त्याच्या कामाच्या भेटीनंतर लगेचच आजीमाजी खासदारांच्या समर्थकांमध्ये व्हिडिओ , रिल्स सामना पहावयास मिळत आहे . विशेष या महामार्गाच्या रखडलेल्या कामामूळे अनेकांचा बळी गेलेला आहे . कामासाठी सर्वत्र मोठ्या प्रमाणात आंदोलने देखिल झाली आहेत हे विशेष . सध्या या बाबत सोशलमिडिया वर जोरदार चर्चांना उधाण आले आहे .

Post a Comment

0 Comments