नगर जिल्ह्यातील या बाजार समितीने दिला मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाखांचा धनादेश
राहुरी ( प्रतिनिधी )
राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईतील वरळी डोम येथे राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस रु. २१,००,०००/- चा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी संचालक मंडळाच्या या संवेदनशील कृतीचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले. यावेळी संबोधित करताना मा. अजितदादांनी 'राज्यातील अनेक भागांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टी
आणि पूरपरिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे झालेले हे नुकसान केवळ आर्थिक नव्हे, तर भावनिकही आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी राहूरी बाजार समितीच्या संचालक मंडळाने दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता खरंच कौतुकास्पद असून प्रत्येकाने यातून प्रेरणा घ्यायला हवी, असे आवाहन केले.
यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. हसन मुश्रीफ, राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री.अरुण बाबुराव तनपुरे यांच्यासह संचालक मंडळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते, प्रवक्ते आणि इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments