नगरपालिका , नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाने या नेत्यांवर दिली जबाबदारी
अहिल्यानगर ( विशेष प्रतिनिधी )
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी नगर जिल्ह्यात तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांची निवड भाजपाने आज जाहीर केली असून त्यात तीन गणमान्य व्यक्तींचा समावेश आहे .
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्थानिक स्वराज संस्था जिल्हा निवडणुक प्रमुख व जिल्हा निवडणुक प्रभारी यांच्या नियुक्तिची घोषणा केली आहे.
राज्यातील 75 संघटनात्मक जिल्ह्यांच्या निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारी अशा पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर केली आहे .
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नगर शहरासाठी निवडणूक प्रमुख म्हणून विक्रम पाचपुते यांची तर नगर उत्तर जिल्ह्यासाठी श्रीमती स्नेहलता कोल्हे आणि नगर दक्षिण साठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून अहिल्यानगर जिल्ह्यासाठी निवडणूक प्रभारी म्हणून राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील हे सर्व निवडणुकीचे काम पाहणार आहेत .


Post a Comment
0 Comments