Type Here to Get Search Results !

पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अमलदारांमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण


पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष अमलदारांमुळे वाचले आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण


राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी पोलीस स्टेशनला आज दिनांक 4 11 2025 रोजी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास 112 क्रमांकावर तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मोबाईलवर श्री विराज पेरणे राहणार तांदुळवाडी यांचा कॉल आला की एक इसम राहुरी रेल्वे स्टेशन येथे त्याची मोटरसायकल लावून आत्महत्या करत असल्याबाबत त्याच्या स्टेटस वरून माहिती मिळालेली आहे.



सदर माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस अमलदार सचिन ताजणे व प्रमोद ढाकणे यांना तात्काळ पाचरण करून इसम नामे महिंद्र देविदास कोळशे राहणार भेर्डापूर तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर 9322285908 हा राहुरी रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या करण्याच्या तयारीत रुळावर आडवा झोपलेला असताना त्याला तात्काळ रुळावरून बाजूला घेऊन त्याला आत्महत्या पासून परावृत्त केले आहे.

सदर पोलिसांच्या तत्परतेमुळे सदर इसमाच्या नातेवाईकांनी तसेच राहुरी तालुक्यातील नागरिकांनी सदर अमलदार यांचे कौतुक केले. तसेच या कामगिरी बाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गाडगे साहेब अपर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त पवार साहेब यांनीही राहुरी पोलिसांचे अभिनंदन केले.


 

Post a Comment

0 Comments