Type Here to Get Search Results !

साखर कारखान्यांनी तोडला राहुरीतील साडेतीन लाख मे. टन ऊस ; या खाजगी कारखान्याने दिला प्रतिटन 3 हजार रुपये भाव

साखर कारखान्यांनी तोडला राहुरीतील साडेतीन लाख मे. टन ऊस ; या खाजगी कारखान्याने दिला प्रतिटन 3 हजार रुपये भाव


राहुरी ( प्रतिनिधी )


गेल्या महिन्याभरात राहुरी तालुक्यातून जवळपास साडेतीन लाख मेट्रिक टन वेगवेगळ्या साखर कारखान्यांनी आपापल्या साखर कारखान्यात गाळपासाठी तोडून नेला आहे .


थंडीच्या कडाक्यात ऊस हंगाम जोरात सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे . 
 

          यंदा अतिवृष्टी झाल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले तसेच ऊस क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . यंदाचा वर्षीचा ऊस गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्यात दिवाळीनंतर सुरू झाला , त्यामुळे ऊस गाळप हंगामांकडं सर्वांचे लक्ष लागलेले होते . राहुरी तालुक्यात गेल्या महिनाभरात साधारणतः साडेतीन लाख मॅट्रिक टन राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर या खाजगी साखर कारखान्यासह जिल्ह्यातील व शेजारील जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपल्या कारखान्यात ऊस गाळपासाठी तोडून नेला आहे . तसेच उसाचे पहिले पेमेंट 3 हजार रुपयांपासून तर 3 हजार 300 पर्यंत विविध साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केले आहे . कठीण परिस्थितीतही ऊस उत्पादकांनी आपला ऊस साखर कारखान्यांना दिला आहे . 

राहुरी तालुक्यातील प्रसाद शुगर साखर कारखाना कारकारखान्याने आज अखेर जवळपास पावणेदोन लाख मेट्रीक टन उसाचे गाळप केले असल्याचे समजते . दरम्यान , प्रसाद शुगर ने उसाची उचल तीन हजार रुपये ऊस उत्पादकांच्या खात्यात जमा केल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . या बाबत प्रसाद शुगरच्या व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क झाला नाही .

राहुरी तालुक्यात आज अखेर पाच ते सहा लाख मे. टन ऊस शिल्लक असून बाहेरील संगमनेर, प्रवरा ,संजीवनी ,गौरी शुगर ,पारनेर, श्रीगोंदा ,मुळा ,आदी साखर कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या राहुरीतील विविध भागात कार्यरत आहेत .

Post a Comment

0 Comments