राहुरी पालिका निवडणुक - तनपुरे गटाचा स्ट्राइक रेट 51 % तर भाजपाचा 40 % ; अपक्षांनी घेतली 15 टक्के मते : विधानसभा पोटनिवडणुकीत काय होणार !!
राहुरी प्रसाद मैड ( विशेष वृत्त )
राहुरी नगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी (विकास आघाडी ) तनपुरे गट गटाला 51% र स्ट्राईक रेट मिळाला असून विरोधी भारतीय जनता पक्षाला 41 टक्के स्ट्राइक रेट मिळाला तर
अपक्ष उमेदवारांना 15 टक्के मते मिळाल्याने सत्ताधारी तनपुरे गटाचा स्ट्राइक रेट सात टक्क्यांनी वाढल्याचे अवलोकन केले जात आहे .
सत्ताधारी गटाने भाकरी न फिरवल्याने पंधरा टक्के मते गेल्याने सर्वांनाच आणखी मेहनत करावी लागणार असल्याचे दिसून येत आहे .
नुकतेच राहुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासह 24 नगरसेवक पदासाठी मतदान व मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली . 72 टक्के मतदान झाल्यावर मतमोजणी प्रक्रिया झाली . यात सत्ताधारी तनपुरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब मोरे यांना 12 हजार 524 तर विरोधी भारतीय जनता पक्षाचे सुनील पवार यांना १० हजार ४५७ मते मिळाली. अन्य उमेदवारांना 925 तर नोटा 230 अशी मत विभागणी झाली .
बारा प्रभागातून सत्ताधारी तनपुरे गटाला बारा प्रभाग अ मधून एकूण 49% मते तर याच 12 प्रभागातील प्रभाग ब मधून 50% मते मिळाली आहेत , तर विरोधी भाजपाला सर्व प्रभाग अ मधून 40% तर सर्व प्रभाग ब मधून 39 टक्के मिळाली मते मिळाली आहेत . अन्य अपक्ष उमेदवारांना मात्र पंधरा टक्के मते मिळाली आहेत .
गेली चार वर्षे नगरपालिकेवर प्रशासक राज असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष गट , आघाड्यांच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी कोणी काय केले ? यावर सध्या जोरदार चर्चा सुरू असून कोणी काहीच केले नसल्याचे नागरिक बोलत आहेत .
तनपुरे गटाचा स्ट्राइक रेट 50 टक्क्यांच्या पुढे तर भाजपाचा स्ट्राइक रेट 40 टक्क्यांच्या आसपास आहे. विरोधी अपक्ष उमेदवारांनी 15% मते मिळवली आहेत हे विशेष आहे . पंधरा टक्के मिळालेली मतं सर्वच पक्ष , गट व आघाड्यांसाठी पुढील पोटनिवडणुकीसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे . त्यामुळे सत्ताधारी तनपुरे गट , विरोधी भारतीय जनता पक्ष व अन्य पक्ष संघटना आघाडी काय निर्णय घेणार ? यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे यात शंका नाही .


Post a Comment
0 Comments