देवळालीत प्रवरेत विद्यार्थ्यांच्या आनंद बाजारात १८८ स्टॉल्सवर झाली सव्वा लाखाची उलाढाल
देवळाली प्रवरा ( जालींदर मुसमाडे , पत्रकार )
नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री . छ .शिवाजी माध्य व उच्च माध्य विद्यालय देवळाली प्रवरा येथे दिनांक 24 डिसेंबर 2025 रोजी आनंद बाजार चे आयोजन करण्यात आले होते .
कडाक्याच्या थंडीत विद्यार्थी सकाळी 11 ते 2 वेळेत हौशीने हजर होते .
या आनंद बाजारचे उदघाटन उपमुख्याध्यापक श्री शिंदे एस .डी . यांच्या हस्ते करण्यात आले .
या वेळी उपस्थिती मान मुख्याध्यापक श्री कडूस पी डी .पर्यवेक्षक श्री डोफे सर तसेच अन्य मान्यवरांची लाभली . या आनंद बाजारात सहभागी विद्यार्थी व विद्यार्थीनी - 188 - स्टॉल्स होते .
विद्यार्थींनी मांडलेले स्टॉल्स - विविध भाज्या खाद्यपदार्थ - पावभाजी पाणीपुरी व्हेज पुलाव चायनीज लस्सी कुल्फी आप्पे डोसे , ओली भेळ बासुंदी गुलाबजामुन वडापाव इ होते . या आनंद बाजारात उलाढाल 1,26,328 रु इतकी झाली . विशेष परिश्रम - श्री चौधरी डी .के .श्री बारगजे ई व्ही श्री काळे सर श्री जाधव सर श्री भांडसर श्रीम कार्डिले मॅडम यांनी घेतले .




Post a Comment
0 Comments