भंडारादरा धरणास 99 वर्षे पूर्ण .. पाटबंधारे विभागाच्या वतीने वाढदिवस साजरा
राजूर / विलास तुपे
( सौजन्य - Live 24 )
आशिया खंडातील सर्वात उंचीवर असलेले भंडारदरा धरण 99 वर्षाचे झाले असून आज पाटबंधारे विभागाच्या वतीने कार्यकारी अभियंता स्वपनील काळे , सहाय्यक अभियंता क्षेणी १ योगेश जोर्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता सागर ढोकने ,कॅनॉल इस्पेक्टर मनीषा भांडकोळी ,वसंत भालेराव सह सर्व कर्मचारी यांचे वतीने वाढदिवस साजरा साजरा करण्यात आला . एवढे भंडारा धरणावर विद्युत स्रोत नाही करण्यात आली होती.
सन 2024 ला भंडारादर जलाशयाचे नामकरण स्वर्गीय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे हस्ते अद्यावत क्रांतिवीर राघोजी भांगरे असे करणेत आले होते.उत्तर नगर जिल्ह्यासाठी हे धरण नव संजीवनी देणारे ठरले आहे.
अकोलेच्या पश्चिमेला असणा-या सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील रत्नाईच्या डोंगरातुन ऊगम पावणा-या अमृतवाहीनी म्हणुन समजल्या जाणा-या प्रवरा नदीवर सन १९१० ते १९२६ या दरम्यान ब्रिटीशांनी शेंडी गावाजवळ दोन टेकड्या अडवुन सह्याद्रीच्या कुशीत प्रवरेचा खळखळ वाहणारा प्रवाह विसावला गेला आणि भंडारदरा धरणाचा जन्म झाला .
दुष्काळी भागामध्ये पाणी मिळावे या उद्देशाने १९०२ साली ब्रिटीश सरकारच्या कालावधीमध्ये सिंचन आयोगाने प्रवरा खो-यात धरण बांधण्याच्या योजनेवर भर दिला .त्याचाच परिणाम म्हणुन १८९९ साली ओझर येथे छोटेखानी बंधारा बांधला गेला . पुन्हा १९०७ साली सह्याद्रीच्या कुशील ब्रिटीश इंजिनियर ऑर्थर हिल याच्या नेतृत्वाखाली कुठे पाणी अडविता येऊ शकते याची चाचपणी केली गेली व १९१० ला प्रत्यक्षात शेंडी गावाजवळ भंडारदरा धरणाच्या निर्मितीस प्रारंभ झाला . धरणासाठी लागणारा दगड परिसरातच खाणी खोदुन तयार करण्यात आला व भिंतीच्या उभारणीच्या कामास सुरुवात झाली .भंडारदरा धरणाच्या भिंतीचे वैशिष्ट्य म्हणजे संपुर्ण काम दगड आणि चुन्यात करण्यात आले तर वाळु म्हणुन दगडांचा चुरा करुन तो उपयोगात आणण्यात आला .थोडे - थिडके नव्हे तर १ कोटी २६ लाख ४ हजार १४० घनफुट बांधकाम करावयाचे होते .जसजसे बांधकाम होत गेले तसतसे पाणी अडविण्यास सुरुवात झाली .नोव्हेंबर १९२० पर्यंत २०० फुटापर्यंत पाणी साठवले गेले .त्याच वर्षी भंडारदरा धरणातुन पाणीही सोडण्यास सुरुवात झाली . ब्रिटीशांनी आणखी २० फुटांनी धरणाची उंची वाढवत २७० फुटापर्यंत बांधकाम नेले .धरणाला एकुण चार पाणी सोडण्याचे दरवाजे असुन त्याच्या झडपा इंग्लंडमधुन आणण्यात आल्या होत्या . आशिया खंडातील सर्वात उंच धरण म्हणुन आज भंडारदरा धरणाची गणना होत आहे .
१९२६ मध्ये भंडारदरा धरणाचे काम पुर्ण झाले .धरणासाठी एकुण खर्च १ कोटी ५० लाख ८३ हजार ४५१ रु खर्च आला . ६५० फुटाचा धरणाचा सांडवाही धरणाच्या दक्षिणेस तयार करण्यात आला . त्याकाळचे ब्रिटीशकालीन मुंबई गव्हर्नर विल्सन यांच्या हस्ते १९२६ साली लोकार्पण करण्यात आले म्हणुन भंडारदरा धरणाला ' विल्सन डॅम ' असेही संबोधण्यात येऊ लागले.
या भंडारदरा धरणाच्या पाण्यावर संपुर्ण उत्तर नगर जिल्हा हरितमय झाला असुन उत्तर नगर जिल्ह्यासाठी वरदान ठरले आहे .याच धरणाच्या पाण्यावर साखर उद्योगही उभे राहीले असुन ख-या अर्थाने ब्रिटीशांनी उत्तर नगर जिल्ह्याचा कायापालट केला असुन एक अनोखी अशी भेटच दिली आहे . आज मितीला भंडारदरा धरण 99वर्षाचे पुर्ण झाले असुन हे भंडारदरा धरण शंभरीकडे झुकत असतानाही अगदी ठणठणीत असेच आहे .




Post a Comment
0 Comments