Type Here to Get Search Results !

मांजरी येथील बिडे यांना कार्य गौरव पुरस्कार प्रदान

 मांजरी येथील बिडे यांना कार्य गौरव पुरस्कार प्रदान

राहुरी ( प्रतिनिधी )

राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ, अहिल्यानगर जिल्हा आयोजित साईनगरी शिर्डी येथील राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळाव्यात मांजरी


 

( तालुका राहुरी ) येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. बाबासाहेब बिडे व अनिल बिडे यांना "कार्यगौरव पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.

 या गौरवासाठी राष्ट्रीय अध्यक्ष श्री भगवान आण्णा बिडवे , जिल्हा प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरणभाऊ बिडवे तसेच जिल्हाध्यक्ष साईभक्त श्री मनोजभाऊ वाघ , नाभिक वधू-वर आयोजन समिती व पदाधिकारी आदी उपस्थित होते

राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ राहुरी तालुका व समाज बांधवांच्या वतीने आमच्या वर टाकलेल्या विश्वासला आम्ही सतत जागरूक राहून आपला विश्वास सार्थ ठरवू हीच पोचपावती देण्याची आम्ही बांधील आहोत अशा भावना बिडे यांनी व्यक्त केल्या .यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे पंचक्रोशीत अभिनंदन केले जात आहे .

Post a Comment

0 Comments