Type Here to Get Search Results !

साई आदर्श मल्टीस्टेटचा समाजकारणात वेगळा ठसा- अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे

साई आदर्श मल्टीस्टेटचा समाजकारणात वेगळा ठसा- अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे



राहुरी फॅक्टरी ( प्रतिनिधी )


साई आदर्श मल्टीस्टेट या संस्थेने केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता समाजकारणातही आपला वेगळा ठसा उमटविला असून संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे संस्थेने वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी केले.



 राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेटच्या सन-२०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन शनिवारी पार पडले. यावेळी पोलिस उपअधिक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण भोसले, साई आदर्श पतसंस्थेच्या चेअरमन संगिता कपाळे, शांती चौक मित्र मंडळाचे दीपक त्रिभुवन,योग प्रशिक्षक किशोर थोरात,रफिक शेख आदी उपस्थित होते. प्रास्तविक साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी केले.


पुढे बोलताना श्री.वाकचौरे म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, क्रीडा, आरोग्य, धार्मिक क्षेत्राबरोबरच गरजू घटकांसाठी मदतीचे हात पुढे करणारी ही साई आदर्श मल्टीस्टेट संस्था इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचेही ते म्हणाले.


पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर म्हणाले की, सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण, क्रीडा, आरोग्य व धार्मिक क्षेत्रात सातत्याने भरीव योगदान देत, समाजातील गरजू व दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात पुढे करणारी साई आदर्श मल्टीस्टेट संस्था मानवी मूल्यांची जपणूक करणारी ठरत आहे. केवळ आर्थिक विकासापुरते मर्यादित न राहता सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून राबविलेले उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवून आणत असून, त्यामुळे ही संस्था इतर संस्था व घटकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी साई आदर्श मल्टीस्टेटच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.दोन वर्षात तालुक्यातील 98 पळवून नेलेल्या मुली परत आणून पालकांच्या स्वाधिन केल्याबद्दल ठेंगे साहेब यांचा विशेष गौरव करण्यात आला.


यावेळी प्रा.जालिंदर गागरे, सोमनाथ पांगरे,शिवाजी गीते, सुनील संचेती, अन्सार शेख, रंगनाथ घाडगे, शरद देसाई,रामेश्वर तोडमल, जयश्री पांगरे, चैताली कपाळे,साई त्रिभुवन,भगवान डोंगरे,मॅनेजर सचिन खडके,आदिंसह साई आदर्श मल्टीस्टेटचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन गणेश विघे यांनी केले.आभार किशोर थोरात यांनी मानले.

Post a Comment

0 Comments