Type Here to Get Search Results !

इंग्लिश एक्झिबिशनमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास: प्राचार्य प्रमोद तोरणे

 इंग्लिश एक्झिबिशनमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास: प्राचार्य प्रमोद तोरणे



 लोणी / प्रतिनिधी : - ज्ञानेश्वर साबळे

 इंग्लिश एक्झिबिशनमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होते ,त्यांचे संभाषण कौशल्य आणि व्यवहारिक ज्ञान यामध्ये भर पडते , आजच्या युगात इंग्रजी भाषेचे ज्ञान हा केवळ एक विषय नसून भविष्यातील संधीचे ते एक महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी केले.



श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल, भिंगार येथे आज इंग्लिश एक्जीबिशनचे आयोजन करण्यात एक्झिबिशन चे उद्घाटन प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे ,मुख्याध्यापक नारायण आणि मुले ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक मुस्तकीम पठाण ,पर्यवेक्षिका कविता शिंदे , श्रीमती पद्मजा सुरकुटला यांच्या हस्ते संपन्न झाले. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेमध्ये संभाषण कौशल्य करता यावे यासाठी या एक्झिबिशनचे आयोजन करण्यात आले होते. एक्झिबिशन मध्ये विद्यार्थ्यांनी वर्किंग मॉडेल्स बनवले त्यामध्ये अपोजिट वर्ड्स ,रायमिंग वर्ड्स, पार्टस ऑफ स्पीच, टेन्स, सीनोनिम्स, टाइप ऑफ सेन्टेन्सेस, नेम ऑफ थिंग्स ,आर्टिकल्स, लिटरेचर त्याचबरोबर नववीतील विद्यार्थ्यांनी इंग्रजी लेखकांवर आधारित मॉडेल्स बनविले होते त्यात ,विल्यम शेक्सपियर ,जॉन गेट्स ,सुधा मूर्ती असे अनेक मॉडेल्स बनविले होते. विद्यार्थ्यांनीही या एक्जीबिशनला भरभरून असा प्रतिसादही दिला. यावेळी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments