Type Here to Get Search Results !

धुमाळ विद्यालयातील विद्यार्थीची पुणे विभाग , राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

धुमाळ विद्यालयातील विद्यार्थीची पुणे विभाग व राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

राहुरी ( प्रतिनिधी )

              अहिल्यानगर जिल्हा क्रीडा कार्यालय आयोजित शालेय जिल्हास्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेत लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय 17 वर्ष वयोगट मुलांच्या संघाने प्रथम



क्रमांक पटकावत पुणे विभाग स्तरावर निवड झाली तर 19 वर्षे मुलांच्या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकवला.

             अहिल्यानगर टेनिस क्रिकेट असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेतून सहा खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. 

      या गुणवंत खेळाडूंचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अनिता वेताळ, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र गोसावी,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य उऱ्हे मंजाबापू,कार्यालयीन प्रबंधक गणेश देशमुख, वरिष्ठ लिपिक प्रफुल तनपुरे,कार्यालयीन सेवक संदीप भांड, अशोक बिगडगर,संजय गुलदगड यांनी कौतुक केले. 

   *17 वर्षे मुले* - गाडे चैतन्य सचिन,शेख साद फारुख, भोंगळ हर्षद अशोक, पठाण अन्वर समीर, आढाव अमृत सोपान, थोरात विठ्ठल शिवाजी, दरंदले अथर्व अनिल, सय्यद समद समीर, बाचकर तुषार शिवाजी, बाचकर ऋषिकेश भाऊसाहेब, सोळसे अजय अप्पासाहेब, बलसाने प्रथमेश दीपक, शिंदे साईराज प्रवीण, लाड दीपक अशोक, बर्डे अजिंक्य सिताराम, शेख सुभान अकबर, भामरे हर्ष राजेंद्र, संकेत बाबासाहेब पडागळे, भागवत आदित्य मंगेश इत्यादी खेळाडूंचा समावेश होता.

         या गुणवंत खेळाडूंना श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अरुण बाबुराव तनपुरे पाटील तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर भास्कर कोळसे पाटील व जनरल सेक्रेटरी श्री. हर्षदादा अरुण तनपुरे पाटील यांनी कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

                   या खेळाडूंची पुणे विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली तर सहा खेळाडूंची राज्यस्तरावर निवड झाली. अशी माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा संचालक श्री.संतोष रामदास बर्डे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments