स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या तालुका कार्यकारिणीची निवड
लोणी ( प्रतिनिधी )
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या वतीने तालुका राहता येथे नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. या निवडीत तालुका कार्याध्यक्ष पदी श्री संपत डी. निर्मळ (आबा) यांची, तर उपाध्यक्ष पदी श्री ज्ञानेश्वर साबळे व कार्यकारणी सदस्य पदी श्रीपाद बोकंद यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
श्री संपत निर्मळ (आबा) आणि श्री ज्ञानेश्वर साबळे श्रीपाद बोकंद यांना समाजकार्याची आवड, सामाजिक प्रश्नांबाबतची जाणीव व सामान्य जनतेसाठी काहीतरी करण्याची तळमळ यासाठी परिचित आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय व पत्रकार संघटनांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. संघटनेच्या माध्यमातून पोलीस, पत्रकार आणि नागरिक यांच्यात समन्वय साधत सामाजिक हिताची कामे अधिक प्रभावीपणे होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनीही संघटनेच्या उद्दिष्टांनुसार प्रामाणिकपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला. त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


Post a Comment
0 Comments