Type Here to Get Search Results !

नगर मनमाड नॅशनल हायवेला आली नवीन बॅरीगेट !! पहा कुठे ते...

 नगर मनमाड नॅशनल हायवेला आली नवीन बॅरीगेट !! पहा कुठे ते...



राहुरी तालुक्यात रोडचे काम चालू असल्याने होणाऱ्या अपघात टाळण्यासाठी राहुरी पोलिसांना सी एस आर फंडातून क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण कंपनीकडून प्रदान करण्यात आले बॅरीकेट 



राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नगर मनमाड रोड चे काम चालू असल्याने बऱ्याच वेळी काम चालू असलेल्या भागांमध्ये ट्राफिक वनवे करावी लागते .सदर वनवे करताना रात्रीच्या वेळी सुस्पष्ट दिशादर्शक फलक लावणे गरजेचे असते .



सदर काम संबंधित ठेकेदार करत असतात . परंतु बऱ्याच वेळी व्यवस्थित बॅरिकेटिंग व दिशादर्शक फलक लावलेले नसल्याने किंवा अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ड्रायव्हर जन करण्यासाठी बँकेची आवश्यकता असते . या गोष्टीची गांभीर्यपूर्वक दखल घेत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी ॲक्सिस क्रेडिट ग्रामीण बँकेचे श्री ज्ञानेश्वर कदम यांच्याकडे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हेड मधून काही उपाययोजना करता येईल का याबाबत विचारणा केली असता सदर कंपनीच्या व्यवस्थापनाने तात्काळ होकार देत राहुरी पोलीस स्टेशन करिता 15 व सोनई पोलीस स्टेशन करिता 10 पोर्टेबल बॅरिकेट्स रिफ्लेक्टर सह आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी उपलब्ध करून दिले .

सदर समन्वय साधण्यासाठी क्रेडिट ॲक्सिस ग्रामीणचे श्री रवि रक्ताते ,विलास पडघन ,विकास पाटील,प्रमोद गवांदे ,महेश गोरे आणि श्रीकांत पोपळघट मेहनत घेतली .


यावेळी राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने क्रेडिट ॲक्सिस बँकेच्या टीमचा पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ , नितीन सप्तर्षी,पोलीस हवालदार नवले, पोलिस हवालदार शेळके, पोलीस हवालदार नागरगोजे गोपनीय शाखेचे पोलीस हवालदार शिंदे लेखनिक आजिनाथ पाखरे सचिन ताजणे यांनी सन्मान केला .

Post a Comment

0 Comments