Type Here to Get Search Results !

एलसीबीची मोठी कारवाई ; घरफोडी करणारे आरोपी जेरबंद - सात दिवसाची पोलीस कोठडी राहुरीतील दोन गुन्हे उघड

एलसीबीची मोठी कारवाई ; घरफोडी करणारे आरोपी जेरबंद - सात दिवसाची पोलीस कोठडी , राहुरीतील दोन गुन्हे उघड


सतर्क खबरबात जिल्ह्याची ( विशेष वृत्त )



राहुरी येथे घरफोडी चोरी करणारे 02 आरोपी मुद्देमालासह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई



 प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 11/12/2025 रोजी सकाळी 06/25 वा.चे पुर्वी फिर्यादीचे राहते घरी संत कृपा निवास, नवीन कोर्टाचे पाठीमागे भुजाडी इस्टेट, मल्हारवाडी रोड, राहुरी बु ाा ता.राहुरी येथे दोन अज्ञात चोरट्यानी बंद घराचे कडी कोंयडा तोडुन आत प्रवेश करुन





बेडरुममधील फर्निचरचे कपाटाचे लॉक कशाने तरी तोडुन घरातील सोने, चांदीचे दागिणे, रोख रक्कम व बॅकेचे पासबुक, सोन्याच्या पावत्या चोरुन नेल्या आहेत. व फिर्यादीचे घराजवळ राहणारे 1) सुधाकर गंगाधर खाडे, 2) करणजितसिंग कृपालसिंग कथुरीया रा.शुक्लेश्वर चौक,राहुरी यांचे घरीपण चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.


सदर घटनेबाबत फिर्यादी भास्कर भागवत कोळी रा. नवीन कोर्टाचे पाठीमागे भुजाडी इस्टेट, मल्हारवाडी रोड, राहुरी बु ाा ता.राहुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 1353/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ), 3(5) प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. 

 मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिले होते. 

 वर नमुद सुचनेनुसार पो. नि. श्री किरणकुमार कबाडी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, योगेश कर्डीले, रमीजराजा आत्तार, विशाल तनपुरे, भगवान थोरात, प्रशांत राठोड, चालक चंद्रकांत कुसळकर, अरुण मोरे, महिला पोलीस अंमलदार छाया माळी, कल्याणी आव्हाड, यांचे पथक तयार करुन आरोपीचे शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले होते. 

 पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन गुन्ह्यातील आरोपींचा व्यवसायीक कौशल्य आधारे शोध घेत असतांना दिनांक 22/11/2025 रोजी माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे 1) मुक्तार मेहबुक शेख व त्याचा साथीदार 2) शाहरुख शेखलाल शेख यांनी केला असुन, ते सध्या लोणी ते नांदुर शिंगोटे जाणारे रोडलगत गोगलगावचे शिवारात गोरडे पेट्रोलपंपापासुन काही अंतरावर उभे असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावुन सापळा रचुन त्यांना मोटार सायकलसह शिताफीने ताब्यात घेवुन त्यांचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) मुक्तार मेहबुब शेख, वय- 34 वर्षे रा. नुराजनगर, पाचोरा, ता.पाचोरा, जि. जळगांव, 2) शाहरुख शेखलाल शेख, वय- 32 वर्षे रा. बहारपुरा, पिंजारवाडी, पाचोरा, ता. पाचोरा, जि. जळगांव असे असल्याचे सांगितले. त्यांना सदर गुन्हयाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा आम्ही दोघांनी मिळुन केला असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन पंचासमक्ष सदर दोन्ही इसमाचे व मोटार सायकल हिस लावलेली पांढ-या रंगाची पिशवीची झडती घेतली असता तेथे, ऍ़क्सिस बॅकेचे पासबुक, बॅक ऑफ महाराष्ट्राचे पासबुक, रतनलाला बाफना नावाचे पावत्या, श्री लक्ष्मी कुबेर धन्वंतरी यंत्र, 5000/-रु कि.चे तांबे धातुची परात, छोटा कलश, मोठा कलश, घंगाळ, ताट, 20,000/-रु कि.चे दोन मोबाईल, 1,10,000/-रु कि.ची एक मोटार सायकल, 5,11,900/-रु कि.चे सोन्याची लगड, 100.140 ग्रॅम वजनाची व रवा 2.240 ग्रॅम वजनाचे असा एकुण 6,46,900/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 

 तसेच आरोपी नामे मुक्तार मेहबुब शेख व शाहरुख शेख यांना मोटार सायकल बाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता सदरची मोटार सायकल हि त्यांनी जळगांव येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर मोटार सायकल बाबत अभिलेखाची खात्री करता, रामानंद पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.400/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली आहे.

 आरोपी नामे मुक्तार मेहबुक शेख याचेविरुध्द यापुर्वी जळगाव , नाशिक जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 पाचोरा, जि. जळगांव 115/2009 भा.द.वि. क. 380

2 पाचोरा, जि. जळगांव 118/2009 भा.द.वि. क. 380

3 पाचोरा, जि. जळगांव 86/2010 भा.द.वि. क. 380,457

4 पाचोरा, जि. जळगांव 145/2010 भा.द.वि. क. 380

5 पाचोरा, जि. जळगांव 149/2010 भा.द.वि. क. 380

6 पाचोरा, जि. जळगांव 154/2011 भा.द.वि. क. 380,457

7 पाचोरा, जि. जळगांव 179/2010 भा.द.वि. क. 380,34

8 पाचोरा, जि. जळगांव 55/2012 भा.द.वि. क. 143,147,,148,353,332,

9 पाचोरा, जि. जळगांव 197/2014 भा.द.वि. क. 380,457,454

10 पाचोरा, जि. जळगांव 86/2020 भा.द.वि. क. 323,324,504,506

11 पाचोरा, जि. जळगांव 267/2023 भा.द.वि. क. 394,458,34

12 पहुर, जि.जळगांव 23/2016 भा.द.वि. क. 380,454,457

13 मारवड, जि. जळगांव 08/2016 भा.द.वि. क. 380,457

14 रामानंदनगर, जि. जळगांव 06/2016 भा.द.वि. क. 380,454,457

15 रामानंदनगर, जि. जळगांव 22/2016 भा.द.वि. क. 380,454,457

16 चाळीसगांव शहर, जि.जळगांव 484/2014 भा.द.वि. क. 380,454,457,34

17 जिल्हा पेठ, जि.जळगांव 24/2013 भा.द.वि. क. 380,457

18 जिल्हा पेठ, जि.जळगांव 2/2016 भा.द.वि. क. 380

19 एमआयडीसी, जि. जळगांव 22/2016 भा.द.वि. क. 380

20 मनमाड, जि.नाशिक 324/2025 बी.एन.एस. क.310(4),3 (5)

 आरोपी नामे शाहरुख शेखलाल शेख याचेविरुध्द यापुर्वी जळगाव , नाशिक जिल्ह्यामध्ये खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.

अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम

1 चाळीसगांव शहर, जि.जळगांव 484/2014 भा.द.वि. क. 380,454,457,34

2 मनमाड, जि.नाशिक 324/2025 बी.एन.एस. क.310(4),3 (5)

 ताब्यातील आरोपी व जप्त मुद्देमाल राहुरी पोलीस ठाणे गु.र.नं. 1353/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(अ), 3(5) प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासकामी हजर करण्यात आले असुन, पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

 सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments