रात्री बिबट्याच्या भितीने शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्यावे लागते ; कालव्यातून पाणी सोडा - माजीमंत्री प्राजक्त तनपुरे
राहुरी ( प्रतिनिधी )
मुळा धरणाच्या डावा व उजवा तसेच निळवंडे धरणाच्या कालव्या द्वारे शेतीसाठी आर्वतन सोडण्याची मागणी माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केली आहे.
सध्या शेतकऱ्यांची शेतीमध्ये उस, हरभरा, गहु व कांदा या पिकाच्या लागवडीची लगभग चालु आहे. त्यात शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नसल्याने व रात्री बिबटयाच्या भितीने शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीला पाणी द्यावे लागत आहे.त्यामुळे शेती करीता दोन्ही धरणातून तात्काळ आवर्तन सोडावे .
मुळा धरणाच्या दोन्ही कालव्या द्वारे तसेच निळवंडे धरणातून तालुक्यातील जिरायत भागातील शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याची अतिशय गरज असून सद्या शेतकऱ्यांचा गहू हरभरा ऊस व कांदा पिकाच्या लागवडी सुरु असून या पिकासाठी पाण्याची.तीव्र गरज भासत असल्याने मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून तसेच निळवंडे धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी तनपुरे यांनी केली आहे.
राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या दोन्ही कालव्याखालील शेतकऱ्यांना शेतात पिकांसाठी सध्या पाण्याची नितांत गरज भासत आहे. शेतकरी नुकताच नैसर्गिक अस्मानी संकटामुळे मोठ्या प्रमाणावर अडचणीत सापडलेला आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कापूस, कांदा, तूर, सोयाबीन पिके मोठया प्रमाणावर ठिकाणी वाया गेली. उसाला तुरे फुटल्याने वजन घटले आहे.यातूनच शेतकरी मोठ्या अडचणीतून मार्ग काढत कांदा, गहू, हरभरा इत्यादी पिकांच्या लागवडी करत आहे. शेतातील पिकांना पाण्याची गरज भासत असल्याने मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यातून व निळवंडे धरणातून शेतीसाठी पाणी सोडावे, अशी शेतकऱ्यांची मागणी माजी राज्यमंत्री तनपुरे यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments