राहुरीतील त्या ठिकाणी चारचाकी वाहन जळून खाक ; जीवित हानी टळली : पहा कोठे ते
सतर्क खबरबात जिल्ह्याची ( विशेष वृत्त )
( सदर व्हिडिओ एक्सक्लुझिव्ह आहेत )
एका घाटाजवळील चार चाकी वाहन आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे . हा व्हिडिओ राहुरी तालुक्यातील असावा अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे .
( सदर व्हिडिओ एक्सक्लुझिव्ह आहेत )
अलीकडच्या काळामध्ये अनेक वाहनांमधील तांत्रिक चुका , त्रुटींमुळे वाहने आगीच्या भक्षस्थानी पडत आहेत . बहुतांश ठिकाणी वाहने ही तांत्रिकदृष्ट्या अनधिकृत व कुठल्याही तपासणी विना चालवली जातअसल्याने अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे . मात्र ही चार चाकी वाहने भक्षस्थानी पडल्या नंतर मोठ्या प्रमाणात जीवित हानी मात्र टळली आहे .
( सदर व्हिडिओ एक्सक्लुझिव्ह आहेत )
त्यातच आज गुरुवारी दिवसभर एका घाटाजवळील चार चाकी वाहन जळाल्याचा व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत आणि त्यातच राहुरी तालुक्यातील हे संबंधित वाहन असल्याची चर्चा सुरू आहे . राहुरी तालुक्यातील राहुरी- म्हैसगाव रस्ता , राहुरी - टाकळीमिया - लाख रस्ता , राहुरी फॅक्टरी - कनगर रस्ता , राहुरी - बारागाव नांदूर रस्ता , अशा अनेक रस्त्यांवर अनधिकृतरीत्या अनेक अवजड वाहने वाहतूक करतात .
याची कोणतीही दखल कोणतेही शासकीय विभाग घेत नाहीत . त्यातच आज व्हायरल झालेल्या आगीच्या भक्षस्थानी जळून खाक झालेल्या चार चाकी वाहनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या विषयाची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे . संबंधित व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे मधील वाहनाने पेट घेतल्यामुळे अन्य रहदारी असणाऱ्या वाहने व जीवित हानी टळल्याचेही बोलले जात आहे .
दरम्यान हा व्हिडिओ राहुरी तालुक्यातील असावा याची चर्चा सुरू आहे व आता या घटनेनंतर पोलीस विभाग ,आरटीओ विभाग ,महसूल विभाग, वन विभाग , महसूल मंडल बीट विभाग अशा नेमक्या कोणत्या शासकीय विभाग लक्ष घालेल ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .
राहुरी तालुक्यात कुठलीही शासनाची परवानगी न घेता मधील अवैद्य मुरूम उत्खनन चालू आहे . रस्त्याची परवा न करता अशी अनेक डंपर हायवा अशी वाहने अनधिकृत रित्या लोकांच्या जीवाची परवा न करता वाहने चालवतात . यापूर्वीही अशा घटना झाल्या आहेत . त्याकडे जास्त लक्ष दिले नाही म्हणून पुन्हा ही घटना झाली .
संबंधित वाहन राहुरीचे दिशेने चालला होता परंतु घाटामध्ये मध्य भागामध्ये गाडी मध्ये जास्त वजन असल्याने व जास्त लोड असल्यामुळे त्याने पेट घेतला व त्यामध्ये पूर्ण गाडी जळून खाक झाली अशी चर्चा आहे .
सध्या कोणाचेही कोणाकडे लक्ष नसल्याने सर्व अनधिकृत विषयक बाबी सुरू आहेत जिल्हा प्रशासनाने अशा घटनांकडे गांभीर्याने माहिती घेऊन तात्काळ संबंधित महसूल ,पोलीस ,वन ,आरटीओ , या घटनेकडे लक्ष देण्याची मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे .



Post a Comment
0 Comments