Type Here to Get Search Results !

ग्रामीण आवाजाचा राज्यस्तरीय गौरव ; पत्रकार शहाजी दिघे व शंकर सोनवणे यांना महाराष्ट्र गौरव रत्न २०२५

ग्रामीण आवाजाचा राज्यस्तरीय गौरव ; पत्रकार शहाजी दिघे व शंकर सोनवणे यांना महाराष्ट्र गौरव रत्न २०२५



लोणी ( प्रतिनिधी )

 महाराष्ट्रातील सामाजिक -जागरूकता, ग्रामीण प्रश्नांवरील भेदक लिखाण आणि धारदार पत्रकारितेची ओळख निर्माण करणारे सामाजिक पत्रकार शहाजी सुखदेव दिघे आणि शंकर किसन सोनवणे यांना यंदाचा “महाराष्ट्र गौरव रत्न २०२५” हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच सुवर्ण भरारी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने देखील त्यांचा शाल पुष्प गुच्छ व श्री संत नरहरी महाराजांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला व अनेक संघटनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आले जिल्हाभरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.


७ डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात प्रथमच या भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न असून, ग्रामीण पत्रकारितेतील त्यांच्या प्रभावी कार्याचा अधिकृत गौरव मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला 

ग्रामीण भागातील दुर्लक्षित प्रश्नांना राज्याच्या पातळीवर नेणे, शासनाला उत्तरदायी धरणे, सामाजिक बदलासाठी निर्भीड भूमिका मांडणे— या त्यांच्या कार्यामुळे दोघेही ग्रामीण पत्रकारितेतील प्रभावी चेहरे ठरले आहेत.


पत्रकारितेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांतही त्यांनी सक्रिय भूमिका निभावली आहे. त्यांची स्पष्ट लेखनशैली, जनतेच्या प्रश्नांवरील ठाम भूमिका आणि प्रशासनासमोर प्रश्न रेटण्याची धडाडी ही त्यांची ओळख बनली आहे.


या सोहळ्याला बॉलिवूड, मराठी आणि साऊथ चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन आर. एन. जी. सी. ग्रुप व विद्यराज फाऊंडेशन यांच्या वतीने होते नियोजन डॉ. सुरेश झाडे, सिनेअभिनेते सुनील पाटील व डॉ. निहाल राजू कांबळे यांनी केले आहे.

हा सन्मान म्हणजे केवळ दोन पत्रकारांचा गौरव नसून— ग्रामीण पत्रकारितेच्या सामर्थ्याची दखल आणि लोकशाही बळकट करणाऱ्या लेखणीचा सन्मान असल्याचे सर्वत्र व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments