Type Here to Get Search Results !

नारायणराव डौले पाटील यांचे 105 व्या वर्षी निधन

भीष्माचार्य समजले जाणारे नारायणराव डौले पाटील यांचे 105 व्या वर्षी निधन



राहुरी ( प्रतिनिधी )

जोगेश्वरी आखाडा ( तालुका- राहुरी ) येथील शंभरी पार केलेले नारायणराव भगवंतराव डौले पाटील यांचे १०५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले .



गावडे परिवाराचे जावई परिसरातील सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व महाराष्ट्र भूषण त्याचबरोबर वारकरी संप्रदायातील भीष्माचार्य जोगेश्वरी आखाडा परिसरातील धार्मिक व सामाजिक कामातील एक सर्व व्यापक व्यक्तिमत्व ह.भ.प. श्री नारायणराव भगवंतराव डौले पाटील सर्वांचे परिचित (नाना) यांना वयाच्या १०५ व्या वर्षी देवाज्ञा झाली .



असून त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ठीक ५:०० वाजता. जोगेश्वरी आखाडा अमरधाम येथे होणार आहे. 

मल्हारवाडी सहकारी सोसायटी, मल्हारवाडी ग्रामपंचायत, गावडे परिवार यांच्या कडून नानांना भावपूर्ण आदरांजली.!


डौले नानांना भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐💐

येवले आखाडा येथील अखंड हरीनाम

सप्ताहाची मुहूर्तमेढ ज्यांच्या हस्ते

उभी राहीली असे जोगेश्वरी आखाडा

येथील जेष्ठ व्यक्तिमत्व वारकरी भूषण

वै. ह.भ.प नारायण भगवंत डौले(नाना)

    यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻

      💐💐दुखांकित 💐💐

      सप्ताह कमिटी येवले आखाडा 

       समस्त ग्रामस्थ येवले आखाडा

Post a Comment

0 Comments