Type Here to Get Search Results !

राहुरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी डॉ. संतोष उदावंत यांची निवड : सुवर्णकार सराफ संघटने कडून स्वागत

 राहुरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी डॉ. संतोष उदावंत यांची निवड : सुवर्णकार सराफ संघटने कडून स्वागत



 राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदी वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ . संतोष चंद्रकांत उदावंत यांची निवड करण्यात आली . डॉ . उदावंत यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत व अभिनंदन केले जात आहे .



नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे , डॉ . सौ उषाताई तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता



 आली . आज उपनगराध्यक्ष व स्विकृत तीन सदस्यांची निवड प्रक्रिया पालिकेत पार पडली .


यात सत्ताधारी विकास आघाडीच्या कडून डॉ . संतोष चंद्रकांत उदावंत यांची निवड जाहीर करण्यात आली .



 यावेळी डॉ . उदावंत यांची निवड जाहीर होताच राहुरी तालुका सराफ सुवर्णकार संघटनेचे सर्वसदस्य उपस्थित होते . डॉ . संतोष उदावंत यांचा यावेळी सत्कार करण्यात आला .





Post a Comment

0 Comments