Type Here to Get Search Results !

के . के . रेंज येथिल भारतीय सैन्य दलाचा युद्धाचा प्रत्यक्ष थरार पहा व्हिडिओ सह

 के . के . रेंज येथिल भारतीय सैन्य दलाचा युद्धाचा प्रत्यक्ष थरार पहा व्हिडिओ सह 


आहिल्यानगर - [ गोविंद फुणगे , पत्रकार ]


                आहिल्यानगर येथील केके रेंजमध्ये झालेल्या भारतीय लष्कराच्या युद्धसरावातून देशाच्या संरक्षण क्षमतेचे भव्य दर्शन घडले.


 

या सरावानंतर भारतीय लष्कराचे सामर्थ्य पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित झाले असून,


 

कोणत्याही देशाशी केव्हाही दोन हात करण्याची भारताची क्षमता स्पष्टपणे दिसून आली.



या युद्धसरावात रणगाडे, लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून अत्यंत कमी वेळेत अचूक लक्षभेद साधण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या शस्त्रसामग्रीच्या प्रभावी वापरामुळे हा सराव विशेष लक्षवेधी ठरला.

प्रात्यक्षिकातील सर्वांचे प्रमुख आकर्षण रणगाडे होते. ‘अर्जुन’ आणि ‘भीष्म’ रणगाड्यांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले. याशिवाय टी-७२, टी-९०, टी-५५ तसेच बीएनपी-१ आणि बीएनपी-२ या रणगाड्यांचाही सरावात समावेश होता. अत्याधुनिक क्षमता, अचूकता आणि ताकद यामुळे अर्जुन आणि भीष्म रणगाडे सरावाचे केंद्रबिंदू ठरले.

या युद्धसरावामुळे भारतीय लष्कराची सज्जता, शिस्त आणि सामर्थ्य पुन्हा एकदा सिद्ध झाले असून, देशाच्या सुरक्षिततेसाठी लष्कर सदैव सज्ज असल्याचा ठाम संदेश जगाला मिळाला आहे.



Post a Comment

0 Comments