Type Here to Get Search Results !

महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सौ स्मिताताई भारतशेठ भुजाडी यांची बिनविरोध निवड

महिला बालकल्याण समिती सभापतीपदी सौ स्मिताताई भारतशेठ भुजाडी यांची बिनविरोध निवड


राहुरी ( प्रतिनिधी )

        राहुरी नगर पालिकेच्या स्थायी समिती विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध होऊन महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. स्मिता भारत भुजाडी , तर शिक्षण समितीच्या सभापतीपदी उपगराध्यक्ष गजानन भागवत सातभाई ,



स्थायी समितीच्या सदस्यपदी सत्ताधारी विकास आघाडीचे ७ तर विरोधी भाजपच्या एका सदस्यांची एकमताने निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ अमीत पवार यांनी जाहीर केले.



नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री प्राजक्त तनपुरे , बाजार समिती सभाापती अरुण तनपुरे , विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी विकास आघाडीचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे यांच्या  १८ नगरसेवक निवडून आले तर जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ सुजय विखे व भाजप युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डीले यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे ७ सदस्य निवडून आले तर स्वीकृत सदस्य पदी सत्ताधारी गटाचे २ तर विरोधी भाजपचा एक सदस्य निवडण्यात आला.

आज सकाळी पालिकेच्या स्थायी व विषय समितीच्या निवडीसाठी तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी डॉ अमीत पवार यांचे अध्यक्षतेखाली व नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे व मुख्याधिकारी अभिजित हराळे यांचे उपस्थितीत पालिकेच्या सभागृहात नगरसेवकांची सभा झाली .

 सकाळी विषय समितीच्या निवडणुका झाल्या,  त्यात महिला बाल कल्याण समितीच्या सभापती म्हणून स्मिता भारत भुजाडी, वृषाली नंदकुमार तनपुरे, संगीता शहाजी जाधव,आस्मा अरिफ शेख,प्रियांका अमोल काशीद, मनीषा सचीन भोंगळ यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. महिला बाल कल्याण समितीवर सताधारी विकास आघाडीचे ४ तर विरोधी भाजपच्या २ जणींची वर्णी लागली.

शिक्षण समितीच्या सभापती म्हणून पालिकेचे उपगराध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असून गजानन भागवत सातभाई, केतन दशरथ पोपळघट, प्रतीक रावसाहेब तनपुरे, बबन कोंडीराम गुलदगड, व विरोधी सदस्या प्रसन्ना राजेंद्र वराळे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर स्थायी समितीच्या सदस्य म्हणून नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे,  उपनगराध्यक्ष गजानन सातभाई, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती स्मिता भुजाडी हे पदसिद्ध सदस्य असून इतर सदस्यामध्ये गट नेते हर्ष अरुण तनपुरे,सोन्याबापू वसंतराव जगधने, प्रदीप नानासाहेब भुजाडी, सिंधू सुभाष डावखर यांची निवड करण्यात आली. या समितीवर सत्ताधारी गटाचे ६ तर विरोधी गटाच्या एका सदस्यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे, माजी खासदार प्रसाद तनपुरे माजी नगराध्यक्षा डॉ उषाताई तनपुरे, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे सभापती अरुण तनपुरे, विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments