महावितरणने वाढीव बिले कमी करून मोठ्या रकमेवर तीन टप्पे करावे - सूर्या फाउंडेशनचे संस्थापक रवींद्र आहेर व नगरसेविका सौ प्रियांका आहेर यांची मागणी
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी शहरातील महावितरणच्या बहुतांश ग्राहकांना चालू महिन्याची वाढीव बिले आल्याने सूर्या फाउंडेशन चे अध्यक्ष रवींद्र आहेर व विद्यमान नगरसेविकासौ प्रियंका आहेर यांनी महावितरण अधिकाऱ्यांना बिले कमी करत वाढीव बिलांचे तीन टप्पे करण्यासाठीचे निवेदन आज दिले .
राहुरी शहरातील बहुतेक ठिकाणी महावितरण कडून वितरित करण्यात येणाऱ्या मासिक जिल्ह्यांमध्ये वाढीव आकडे दिसता च मल्हारवाडी रोडवरील अनेक महिलांनी सूर्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र आहेर व नवनिर्वाचित नगरसेविका सौ प्रियांका आहेर यांना समक्ष भेटून बिले दाखवून वाढीविले आल्याचे लक्षात आणून दिले .
यावर तात्काळ नगरसेविका सौ प्रियांका आहेर यांनी थेट महावितरणच्या शहर विभागातील शहर उपविभागातील कार्यालयात धाव घेतली .
महावितरण चे उपविभाग प्रमुख यांना तात्काळ ही बिले कमी करण्याची विनंती केली . तसेच रुपये दहा हजार पेक्षा अधिक बिलांना तीन टप्पे करावे , अशीही विनंती यावेळी करण्यात आली .
यावेळी नगरसेविका सौ प्रियंका आहेर यांच्या समवेत रत्ना हरेल ,सुनंदा इंगळे ,सुमन गव्हाणे ,इंदुबाई निमसे, रहिसा शेख, प्राची आहेर ,चंद्रभागा इंगळे ,ज्योती कोल्हे ,रेखा इंगळे , वैशाली कोबरणे ,अनिता गडदे ,गायत्री हरेल ,राणी हरेल , आदी महिला उपस्थित होत्या . महावितरणचे राहुरी उपविभागाचे अधिकारी यांनी निवेदन स्वीकारले .



Post a Comment
0 Comments