राहुरी - शनिशिंगणापूर नवी रेल्वे लाईन : भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आली समोर - पहा कोणती आहेत ही गावे
राहुरी ( प्रतिनिधी )
2027 च्या नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार व रेल्वे प्रशासन अलर्ट मोडवर आले असून नव्याने राहुरी - शनिशिंगणापूर रेल्वे लाईन साठी जमीन अधिग्रहण भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली असून
याचीही अधिसूचना जारी करण्यात आली आहे . जाहीर केलेल्या तब्बल राहुरी तालुक्यातील सहा गावातील 389.88 हेक्टर क्षेत्रापैकी 50.33 हेक्टर क्षेत्र संपादित केले जाणार असून सरकारच्या नदी नाला कालवा रस्ता अश 1 . 43 हेक्टर जमीन संपादन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे .
मात्र तांदूळवाडी , देसवंडी , तमनर आखाडा , कोंढवड . उंबरे , ब्राह्मणी येथील बहुतांश शेतकऱ्यांनी अजूनही कोणत्याही शासकीय यंत्रणेने आम्हाला पत्र सूचना नोटीस दिली नसल्याने या रेल्वे मार्गाला आमचा विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे .
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने डिसेंबरच्या 2025 मध्ये भारत राजपत्रात अधिसूचना जारी करत राहुरी - शनिशिंगणापूर या नव्या रेल्वे लाईनची घोषणा केली आहे .
सुरत - चेन्नई हायवे नंतर आता या नव्या रेल्वे मार्गाची निघाली अधिसूचना केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने या रेल्वेमार्गावर भूसंपादनासाठी हालचाली सुरू करत रेल्वेमार्गातील संबंधितांकडून हरकती मागवत मागवल्या .
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विश्वासार्ह माहिती अन बातमी हे ब्रीदवाक्य असणाऱ्या सतर्कने नोव्हेंबर 2023 लाच या रेल्वे मार्गाची बातमी दिली होती .
अवघ्या नगर जिल्ह्यासाठी जिव्हाळ्याचा नारा जगप्रसिद्ध अशा साईबाबांची शिर्डी आणि श्री क्षेत्र शनिशिंगणापूर यांचे महत्त्व लक्षात घेता दौंड - मनमाड या मार्गावरून शनि शिंगणापूरला जाण्यासाठी वेगळी रेल्वे लाईनची मागणी आली. यावर केंद्राच्या अर्थसंकल्पात 2021- 22 मध्ये राहुरी आणि शनिशिंगणापूर यांना जोडण्यासाठी नवी रेल्वे लाईन साठी आर्थिक तरतूद करण्यात आली . या रेल्वे मार्गासाठी राहुरी - शनि शिंगणापूरला इंजिनिअरिंग व मार्ग सर्वेक्षण अशा 25 किलोमीटर अंतराचा सर्वेक्षण करण्यात आले.
राहुरी रेल्वे स्टेशन कडील तांदूळवाडी , देसवंडी , तमनर आखाडा , कोंढवड , उंबरे , ब्राम्हणी व सोनई कडील काही गावांमध्ये गेल्या आठवड्यात भूमी अभिलेख व ड्रोनच्या साह्याने सर्वेक्षण ऑक्टोबर 2023 ला झाले होते . मात्र या सर्वेक्षणाची कल्पना ग्रामीण भागात पाहिजे तशी झालेली नाही . त्यामुळे ग्रामस्थात याबाबत संभ्रम कायम राहीला .
ही रेल्वे लाईन भविष्यात लवकरच झाल्यास राहुरी तालुका निश्चितच जगाच्या नकाशावर येईल . सध्या दौंड मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले असून राहुरी रेल्वे स्टेशन लगत मुळा नदीच्या रेल्वे पुलाशेजारी दुसरा पुल झाला आहे .






Post a Comment
0 Comments