Type Here to Get Search Results !

देवळाली प्रवरा येथे शिवपुराण कथेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शिवरात्रीला फराळ व १६ रोजी काल्याचे कीर्तन

 देवळाली प्रवरा येथे शिवपुराण कथेला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ; शिवरात्रीला फराळ व १६ रोजी काल्याचे कीर्तन

देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) –

 येथील शिवभक्तांच्या पुढाकारातून आयोजित शिवपुराण कथेला नागरिक व भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ९ फेब्रुवारीपासून सुरू झालेली ही शिवपुराण कथा १६ फेब्रुवारीपर्यंत भक्तिमय वातावरणात रंगणार आहे.

प्रख्यात ह.भ.प. श्री. गोरख काका चव्हाण यांच्या ओजस्वी वाणीतील निरूपणामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून दररोज मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत आहेत. कथास्थळी आकर्षक मंडप उभारण्यात आला असून मंदिरावर देखील सुंदर रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.

१५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी शिवभक्तांसाठी फराळ म्हणून साबुदाणा खिचडीचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात येणार आहे.

१६ फेब्रुवारी, सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत शिवपुराण कथेनिमित्त काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. श्री क्षेत्र पैठण येथील ह.भ.प. सौ. सरगम महाराज आगळे यांचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

सदर शिवपुराण कथा सोहळ्याचे आयोजन सर्व शिवभक्त शिवपुराण आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले असून देवळाली प्रवरा परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments