Type Here to Get Search Results !

राहुरीत महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदाराने युवानेत्याचेही ऐकले नाही ! राहुरीकरांमध्ये संताप झाला व्यक्त

राहुरीत महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदाराने युवा नेत्याचेही ऐकले नाही ! राहुरीकरांमध्ये संताप झाला व्यक्त


राहुरी ( प्रतिनिधी )


 गेल्या काही दिवसांपासून नगर कोपरगाव या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 रस्त्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे .


यातच सध्या राहुरी शहरातील रस्त्यालगतचे काम वेगाने सुरू असून राहुरी बस स्थानक ,बस स्थानक चौक, नवी पेठ राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील भाग , धावडे पेट्रोल पंप आणि बारागाव नांदूर रस्ता चौक या भागात रस्ता उंच झाल्याने शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी पसरली आहे .



यामुळे पायी चालणाऱ्यांसह विद्यार्थी , दूचाकी एवढेच नव्हे तर चार चाकी वाहन चालकांना या रस्त्यावरून ये जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे .


याची माहिती समजतात आज सकाळीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली जनजागरण यात्रा बाजूला ठेवून राहुरी बस स्थानकावर धाव घेतली . यावेळी नागरिकांनी त्यांना रस्त्याच्या कामाबाबत आपल्या समस्या सांगितल्या . माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ दूरध्वनीवरून संबंधित ठेकेदाराला बस स्थानक परिसरात बोलावले . यावेळी संबंधित ठेकेदार येताच तनपुरे यांनी संबंधित ठेकेदाराला खडे बोल सुनावत तात्काळ आजच्या आज राहुरी बस स्थानक , नवी पेठ , मार्केट कमिटी समोरील खडी टाकलेल्या ठिकाणी नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दिल्या .संबंधित ठेकेदार नाही माजी मंत्री तनपुरेंच्या सूचनेबाबत कानाडोळा केला . मात्र सायंकाळपर्यंत फक्त बस स्थानकावरील दिसून येत होती . त्यामुळे संबंधित ठेकेदार ठेकेदाराचा मुजोरपणा नागरिकांच्या लक्षात आला .

हा संबंधित ठेकेदार आजी-माजी आमदार , आजी-माजी खासदार व मोठ्या नेत्यांच्या मर्जीतील असल्याची चर्चा सायंकाळी राहुरी शहर व बस स्थानक परिसरात सुरू होती .

या संबंधित मुजोर ठेकेदाराला माजी मंत्री प्राजक्त तनपुरे शहरातील रस्त्याचे डांबरीकरण होण्याच्या आतच यांनी समज देऊन नवी पेठ , मार्केट कमिटी जवळील पसरलेल्या खडीची डागडूजी करण्याची सूचना द्यावी , अशी मागणी केली असून समज द्यावी अशी मागणी होत आहे .

Post a Comment

0 Comments