राहुरी नगरपरिषदेचा कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला
राहुरी ( प्रतिनिधी )
तहसील कार्यालयात ओळख असल्याचे सांगून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात लाच मागणाऱ्या राहुरी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. बाबासाहेब किशोर राऊत (वय ४०, रा. बुरुडगाव रोड, अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
तक्रारदाराचे शासकीय ‘राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य’ योजनेअंतर्गत ३० हजार रुपये मंजूर करून देण्यासाठी राऊत याने १ हजार रुपयांची लाच मागितली होती. मात्र, तक्रारदाराने याबाबत अहिल्यानगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सापळा रचून राऊत याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांनी केले आहे.



Post a Comment
0 Comments