राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रशिक्षणास 328 अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारली दांडी ! कारवाई होणार ?
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक 2026 साठी एकूण 2596 मतदान अधिकारी व कर्मचारी यांची प्रथम प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली आहे.
सदर मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रथम प्रशिक्षण नानासाहेब पवार सभागृह महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी,सावित्रीबाई फुले हायस्कूल राहुरी येथे दिनांक 3 /4 /2026 व दिनांक 4 /4/ 2026 रोजी पार पडले.
सदर प्रशिक्षणास एकूण 2268 अधिकारी/ कर्मचारी हजर होते तर एकूण 328 अधिकारी/ कर्मचारी अनुपस्थित होते. सदर प्रशिक्षण स्थळी उपस्थितांना थीअरी तसेच ईव्हीएम मशीन हाताळणीचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
सदर प्रशिक्षणासाठी मा.निवडणूक निरीक्षक श्री देवानंदा रेयांग(भा. प्र. से) मा डॉ पंकज आशिया,जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मा. निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी श्री अनुप सिंह यादव,जिल्हा नोडल अधिकारी श्रीम गौरी सावंत मॅडम,
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्री डॉ अमित पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर प्रशिक्षणाची जबाबदारी श्रीम संध्या दळवी निवासी नायब तहसीलदार राहुरी यांनी पार पाडली. सदर प्रशिक्षण यशस्वी पार पाडण्याकरिता निवडणूक नायब तहसीलदार श्री बडे ,महसूल नायब तहसीलदार श्री बाचकर ,सर्व मंडळ अधिकारी तसेच ग्राम महसूल अधिकारी राहुरी, सर्व झोनल अधिकारी आणि मनुष्यबळ व्यवस्थापन कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.




Post a Comment
0 Comments