Type Here to Get Search Results !

अर्ज भरणार सांगत तनपुरे यांनी उमेदवारीबाबत ठेवला सस्पेन्स कायम

हजारो कार्यकर्त्यांना अर्ज भरणार सांगत प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारीबाबत ठेवला सस्पेन्स कायम

राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा सस्पेन्स शेवटपर्यंत दिसून आल्याने

गोंधळलेल्या व द्विधा मनस्थितीत असलेल्या हजारो

कार्यकर्त्यांनी आज सायंकाळी राहुरी गाठले .

तनपुरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर हजारो कार्यकर्ते जमल्यानंतर प्राजक्त तनपुरे यांचे आगमन झाले .उपस्थित कार्यकर्त्यांनी तनपुरे यांनी राहुरी तालुक्यासह पाथर्डी , नगर तालुक्याच्या भवितव्यासाठी कोणत्याही पक्षाची वाट न पाहता अपक्ष उभे राहण्याचा मानस व्यक्त करत ही निवडणूक कार्यकर्ते हाती घेतील , असा ठाम विश्वास व्यक्त केला .


यावर प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांची समजूत घालताना म्हटले की , विद्यमान आमदारांच्या दुःखद निधनानंतर ही निवडणूक होत असून प्रसंगी भावनिक प्रसंग आहे . असे असले तरी मतदारसंघातच्या भवितव्याचा विचार करता उद्या सकाळपर्यंत योग्य तो निर्णय घेतला जाईल . निवडणूक लढवण्याबाबत आपणही उद्या अर्ज भरू असे सांगत याबाबत उद्या सकाळी निर्णय घेऊ . कार्यकर्त्यांनी याबाबत शंका बाळगू नये असे आश्वासन तनपुरे यांनी दिले .

 राहुरी तालुक्यासह नगर , पाथर्डी तालुक्यातील मोठ्या संख्येने तनपुरे समर्थक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते . यांच्या आजच्या वक्तव्यामुळे त्यांच्या उमेदवारी बाबत सस्पेन्स उद्यापर्यंत गेला आहे . राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माहिती व चर्चा सर्वश्रुत आहे . मात्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याही या भूमिकेमुळे व उमेदवारीच्या सस्पेन्समुळे चाणक्य नीतिची प्रचिती आज दिसून आल्याची चर्चा होत आहे . उद्या काय होणार ! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments