Type Here to Get Search Results !

साहिल कोहलीने दादा शेळकेला लपेट डाव टाकत केले चितपट ! टाळ्यांच्या कडकडाटात जिंकले २ लाख 51 हजार रुपयांची रोख बक्षीस

साहिल कोहलीने दादा शेळकेला लपेट डाव टाकत केले चितपट ! टाळ्यांच्या कडकडाटात जिंकले २ लाख 51 हजार रुपयांची रोख बक्षीस

राहुरीच्या खंडोबा यात्रेनिमित्त रंगला कुस्त्यांचा फड :  150 कुस्त्या पडल्या पार

राहुरी ( प्रतिनिधी )



          शहराचे ग्रामदैवत मार्तंड देव देवस्थान ट्रस्ट (खंडोबा) महाराज यात्रेनिमित्त भव्य कुस्तीचा फड रंगला . यावेळी हरियाणाचा मल्ल साहिल कोहली ने 2025



महाराष्ट्र केशरी दादा शेळके ला लपेट डाव टाकत चितपत करत टाळ्यांच्या कडकडाटामध्ये 2 लाख 51 हजाराचे रोख पारितोषिक पटकविले .

 या कुस्त्यांसाठी महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील आलेल्या सुमारे 250 मल्लांच्या 13 लाख रुपयांच्या कुस्त्या पार पडल्या. या कुस्त्या पार पाडण्यासाठी  नितीन शिंदे, आप्पा निकम व संभाजी मगदूस यांच्यासह यात्रा कमिटी व गावकऱ्यांचे मोठे योगदान लाभले .

          नांदूर रोड , राहुरी येथे अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या स्टेडियम मध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यातून आलेल्या मल्लांनी हजेरी लावली. तब्बल 150 कुस्तीने उपस्थित मन जिंकले. मानाची कुस्ती मार्तंड देव देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राऊसाहेब चाचा तनपुरे, सचिव सदाशिव शेळके, प्रतीक तनपुरे व यात्रा कमिटीचे सदस्य यांच्या वतीने 2 लाख 51 हजारांचे बक्षीस देऊन हरियाणाचा मल्ल साहिल कोहली यास सन्मानित करण्यात आले. 

सोमवार (6) एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या दरम्यान राहुरी येथे खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा फड रंगला होता . तब्बल 13 लाख रुपयांची रोख बक्षीस यावेळी मल्लांना देण्यात आली. कुस्ती पाहण्यासाठी राज्यभरातून कुस्ती शौकीन राहुरी दाखल झाले होते. यात्रेनिमित्त 250 पहिलवानांनी हजेरी लावली. यावेळी विशेष आकर्षण निवेदक सुरेश धोत्रे ठरले. यावेळी नितीन शिंदे आप्पा निकम संभाजी मगदूम यांनी पंच म्हणून काम पाहिले.

      यावेळी यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब (चाचा) तनपुरे, उपाध्यक्ष दिनकर पवार, सचिव सदाशिव शेळके,नवनाथ पवार, संदीप तमनर यांच्यासह यात्रा कमिटीचे कमिटीचे अध्यक्ष विलास वराळे, उपाध्यक्ष तुषार पवार, गौरव तोडमल, खजिनदार अमोल तनपुरे उपखजिनदार दीपक साळवे, सचिव आकाश येवले, उपसचिव अमोल उंडे, सुनिल पवार,शिवाजी वराळे सुनील भुजाडी , दत्तात्रय येवले,नितीन तनपुरे, नयन शिंगी,राजेंद्र उंडे,साहेबराव डावखर,राजेंद्र शेळके,राजेंद्र सरोदे, सुभाष वराळे, गोरक्षनाथ चव्हाण, शिवाजी डौले सोन्याबापु जगधने आदींनी कुस्त्याचे मैदान पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. 

------

यात्रेनिमित्त राहुरीत 250 मल्लानी राहुरीत हजेरी लावली. यांनाध्ये महिलांच्या देखील कुस्त्या पार पडल्या. कुस्ती पाहण्यासाठी पुरुष वर्गच नाही तर महिलांनी देखील कुस्ती मैदान पाहण्याचा आनंद घेतला. एकूण 150 कुस्त्या पार पडल्या असून 300 मल्लांनी हजेरी लावली.


Post a Comment

0 Comments