राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा भाजपचा उमेदवार असणार अक्षय शिवाजीराव कर्डिलेच
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपाने दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी
जाहीर करत राहुरीतील भाजपा उमेदवाराचा पत्ता ओपन केला आहे .
राहुरीची निवडणूक बिनविरोध होणार ! भाजपचा उमेदवार कोण असणार ! तनपुरे आणि कर्डिले यांच्यात लढत होणार का ! या सर्व प्रश्नांना नक्कीच उमेदवारी जाहीर झाल्याने पूर्णविराम मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे .
दिवंगत आमदार शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान होणार आहे . अक्षय कर्डिले कै आमदार कर्डिले यांचे चिरंजिव आहेत .
शिवाजीराव कर्डिले यांचे गेल्यावर्षी 17 ऑक्टोबर रोजी त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. शिवाजीराव कर्डिले हे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार होते.
शिवाजी कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला. 2019 च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
2025 मध्ये राहुरीत कर्डिले पुन्हा निवडून आले होते . त्यांच्या दुःखद निधनामुळे ही पोटनिवडणूक होत असून राहुरी मधील ही दुसरी पोटनिवडणूक मानली जाते . यापूर्वी 2004 मध्ये तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे लोकसभेत निवडून गेल्यावर त्यांची जागा रिक्त झाल्यानंतर विधानसभा पोटनिवडणूक होऊन त्यात चंद्रशेखर कदम हे भाजपा कडून निवडून गेले होते .




Post a Comment
0 Comments