कथित उद्दाम ,भंगार अधिकारी अन राजकारण्यांनो ! राहुरीकर काय रस्त्यावर पडलेत काय ? राहुरीकरांना मनस्तापासह पश्चाताप झाल्याचे चित्र
राहुरी - ( विशेष वृत )
राहुरी नगरपालिकेने शासनाच्या अभय योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना घरपट्टीमध्ये 50% शास्ती माफ केल्याने मोठ्या प्रमाणात घरपट्टी वसुली व अभय योजनेचा लाभ होत आहे .
[ या वृत्तासंदर्भात काही झोंबले असेल तर कुणाला आक्षेप , वाद , तक्रार करायची असेल त्यांनी कोठेही या वृत्तावर तक्रार करावी ]
मात्र अन्य क वर्ग नगर पालिकांनी त्यांच्या हद्दीतील मालमत्ता धारकांना थेट शंभर टक्के शास्ती माफ करण्याच्या योजनेमुळे राहुरीकरांमध्ये मोठा संताप , मनस्ताप व पश्चाताप दिसून येत आहे .
[ दे धडक...... बेधडक ]
त्यामुळे नेमके कोण भंगार व उद्दाम अधिकारी आणि राजकारणी आहेत ?याची शंका राहुरीकरांना येत आहे .
राहुरीचे रहिवासी रस्त्यावर पडले आहेत काय ? अन भंगार आहेत काय ? असा सवाल करत आहेत . समाज माध्यमावर पुणे जिल्ह्यातील एका क वर्ग नगरपालिकेचे वृत्त हाती आले असून ते असे की, नगरपरिषद क्षेत्रातील थकित मालमत्ता कराची प्रभावी वसुली करण्यासाठी राज्य शासनाने मोठा दिलासा देत 'अभय योजना' लागू करण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत करदात्यांना मालमत्ता करावरील शास्ती ( दंड ) पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दि. २३ मार्च २०२६ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार दि. १९ मे २०२५ पर्यंतची थकीत मालमत्ता कराची रक्कम दि. ३१ मार्च २०२६ पर्यंत भरल्यास संबंधित करदात्यांना १०० टक्के शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेत मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सवलत दिली जाणार नसून अंतिम संधी मानून थकीत कर भरावा .
या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे अधिकार 0000 नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले असून, करदात्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी नगरपरिषदेकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी ==== यांनी या योजनेअंतर्गत थकीत करांची १०० टक्के वसुली सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच घरपट्टीच्या पुनर्मूल्यांकनाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू असून यानंतर अशा प्रकारची कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. त्यामुळे करदात्यांनी ही अंतिम संधी मानून तात्काळ थकीत कर भरावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
केवळ शास्तीवरच पूर्ण माफी लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत थकीत कर भरून योजनेचा लाभ घेता येईल .
राहुरी नगरपालिकेमार्फत सध्या मालमत्ता धारक राहुरी करांकडून 50 % शास्ती माफीचे गाजर दाखवून वसुली केली जात आहे . मग 100% शास्तीमाफी का झाली नाही ? त्यातील झारीतील शुक्रियाचार्य कोण ?
कोणी व कोणत्या निर्देशानुसार ५०% शास्ती माफी सुरु केली याची माहिती द्यावी . कोणते भंगार व काड्या करणारे अधिकारी , पदाधिकारी , शासनकर्ते आहेत ! याबाबत राहुरीकरांनी शंका व संताप उपस्थित केला असून ज्यांनी 50% शास्त्री माफी योजनेचा लाभ घेत सगळी थकबाकी भरली त्यांना पुन्हा धकबाकी भरलेल्या पावत्या पाहून आणखी 50 टक्के शास्ती माफी करावी ,अशी मागणी राहुरीकरांनी केली आहे .



Post a Comment
0 Comments