Type Here to Get Search Results !

अखेर विधान परिषदेसाठी नगर जिल्ह्यातील या नेत्याचे नाव जाहीर

 अखेर विधान परिषदेसाठी नगर जिल्ह्यातील या नेत्याचे नाव जाहीर


राहुरी ( प्रतिनिधी )

अखेर विधान परिषदेसाठी नगर जिल्ह्यातील या नेत्याचे नाव जाहीर झाले असून नगर जिल्ह्यात भाजपा व समर्थकांसाठी समाधानाचे वातावरण पसरले आहे .



गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक प्रक्रिया होणार असून यात भाजपासाठी पाच सदस्य

 


संख्याबळ असणार आहे . त्यामुळे नगर जिल्ह्यातून काही नाव चर्चेत आली होती . आणि 30 एप्रिल ही नाम निर्देशन करण्याची तारीख असल्याने शेवटपर्यंत सस्पेन्स कायम होता .

 आज भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह [ प्रभारी कार्यालय ] यांनी विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी राज्यातील पाच जणांची नावे जाहीर केली असून त्यात नगर जिल्ह्यातील एका नामांकित नेत्याचे नाव जाहीर झाले आहे .

  सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांचे नातू , स्नेहलता ताई कोल्हे व बिपिन दादा कोल्हे यांचे चिरंजीव , उद्योजक विवेक बिपिन दादा कोल्हे यांच्या नावाची घोषणा झाली असून आता नगर जिल्ह्याला व कोपरगाव साठी आणखी एक आमदार विकास कामांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे .

Post a Comment

0 Comments