Type Here to Get Search Results !

या दोन सेवाकर्मींचा सेवापुर्ती निमित्त वेगळा उपक्रम..पहा कोठे ते

या दोन सेवाकर्मींचा सेवापुर्ती निमित्त वेगळा उपक्रम



राहुरी ( प्रतिनिधी )

राहुरी येथील स्टेट बँक शाखेचे कॅशियर ( रोखपाल ) बाबुराव सतोबा चिंधे व राहुरी कॉलेज मधिल ज्ञानेश्वर कपिले सर हे 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत आहेत .

सेवापुर्ती निमित्त टाकळीमिया येथील त्यांच्या गावी सेवापूर्ती व एकसष्ठी निमित्त स्नेहभोजन, सत्कार समारंभ तसेच लक्ष्मण महाराज कदम शास्त्री ( आळंदीकर ) यांचे कीर्तन आयोजित केले आहे .



यास स्टेट बँकेचे असिस्टंट जनरल मॅनेजर संजीव कुमार , एच आर मॅनेजर उत्तम सानम , राहुरीचे ब्रांच मॅनेजर सागर वारुडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे .




 कै . रामदास पाटील धुमाळ कॉलेजचे सेवाकर्मी ज्ञानेश्वर तुकाराम कपिले सर हे देखील 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होत



असून गुरुवार दि . 30 एप्रिल सकाळी राहुरी कॉलेज येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे . कोणीही हार तुरे बुके न आणता वही, पेन व शालेय साहित्य आणावे जेणेकरून त्या गरजूंना दिल्या जातील, असे आवाहन कपिले यांच्या वतीने करण्यात आले आहे . सेवापुर्ती निमित्त या उपक्रमांबाबत श्री शिंदे व कपिले सर यांच्या या उपक्रमाची कौतुक व चर्चा सुरू आहे .

Post a Comment

0 Comments