महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागा कोणासाठी महत्त्वाच्या
Satark Khabarbat JilhyachiApril 16, 20260
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागा कोणासाठी महत्त्वाच्या
सतर्क खबरबात जिल्ह्याची ( विशेष वृत्त )
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 12 मे ला मतदान होणार आहे . यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३०/०४ तर मागे घेण्याची ०४/०५/२०२६ असणार आहे आणि १२ मे लाच ५ वाजता निकाल जाहीर होणार आहे .
या वेळी भाजप कडून जे नाव ऐकले नाहीत ते आमदार होणार आहेत. खूप जण आमदारकीसाठी प्रयत्न करत आहेत. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपला पाच , शिवसेनेला दोन , राष्ट्रवादी काँग्रेसला एक तर महाविकास आघाडीकडे एक जागा येते .
नुकत्याच सध्या राहुरी विधानसभेची पोटनिवडणूक भाजप चा प्रबळ उमेदवार आहे . भाजप उमेदवारासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी मंत्री व आमदारकीचे स्पर्धक असलेले प्राजक्त तनपुरे यांनी भाजप नेत्यांच्या विनंतीनुसार निवडणुकीतून माघार घेतली आहे .
येत्या 20 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरी प्रचारासाठी येत आहेत . त्यातच येत्या 12 मे रोजी होणाऱ्या विधान परिषद ९ जागांसाठी निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे राहुरी चा आणि या विधान परिषद निवडणुकीचा काही संबंध आहे काय याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Post a Comment
0 Comments