Type Here to Get Search Results !

या वरिष्ठ नेत्यांनी घेतला कार्यकर्त्याच्या घरी आमरसाचा आस्वाद दिसून आला साधेपणा पहा कोठे ते.....

या वरिष्ठ नेत्यांनी घेतला कार्यकर्त्याच्या घरी आमरसाचा आस्वाद दिसून आला साधेपणा पहा कोठे ते.....



सतर्क खबरबात जिल्ह्याची - प्रसाद मैड ( संपादक )

विविध निवडणुकांमध्ये राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रचार दौऱ्यात त्यांच्या भोजन व निवासासाठी शानदार हॉटेल्स ची व्यवस्था केली जाते .



मात्र भारतीय जनता पक्ष पक्षाचे काही नेते हे हॉटेल किंवा पंचतारांकित हॉटेल टाळून शक्यतो कार्यकर्त्यांच्या घरी भोजन व निवास करणे पसंत करतात . असाच अनुभव गुरुवारी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या दरम्यान गुरुवारी आला .



राहुरी मध्ये भाजपा उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते . त्यांच्या समवेत विधान परिषदेचे उप सभापती प्राध्यापक राम शिंदे ,  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अन्य पदाधिकारी होते . प्रचार सभेनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपाचे राहुरी तालुका मंडळ अध्यक्ष विक्रम भुजाडी यांच्या निवासस्थानी भोजन केले , या वेळी त्यांनी आमरसाचा ही आस्वाद घेतला .  यावेळी भुजाडी परिवारातील प्रदीप भुजाडी , विक्रम भूजाडी , अक्षय भुजाडी यांनी त्यांचे स्वागत केले  व सत्कार केला . विधान परिषदेचे उपसभापती प्रा . राम शिंदे यांनी जामखेडच्या नगराध्यक्षा  प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्या माहेरघरी राहुरी येथील सराफ प्रकाश दहिवाळकर यांच्या घरी आमरसाचा आस्वाद घेतला . यावेळी त्यांच्या समावेत श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते व अन्य सहकारी उपस्थित होते . यावेळी दहिवाळकर कुटुंबीयांच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला .

अलीकडच्या काळात पक्षाच्या नेत्यांची खाण्यापिण्याची सोय पंचतारांकित हॉटेल व मोठमोठ्या रिसॉर्टमध्ये केली जाते . भाजपाचे स्थानिक नेतेमंडळी माजी पदाधिकारी ही त्याला अपवाद नाहीत . मात्र भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी आपली साधं राहणीमान व कार्यकर्त्यांच्या घरी भोजन ही परंपरा कायम राखल्याची चर्चा होत आहे .  प्रदेशाध्यक्ष चव्हाण , उपसभापती प्रा. राम शिंदे यांच्या या आमरासाच्या आस्वादाची चर्चा राहुरी विधानसभा मतदारसंघात सध्या सुरू आहे .

Post a Comment

0 Comments