राहुरीतील स्टेट बँकेचे एका इसमाने चार एटीएम मशीन फोडले
राहुरी ( प्रतिनिधी )
राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे 4 एटीएम मशिन्स आज सकाळी एका इसमाने फोडल्याची धक्कादायक घटना घडली .
आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास नगर मनमाड रस्त्यावर असलेल्या स्टेट बँकेच्या राहुरी शाखेच्या आवारात चार एटीएम मशिन्स असून आज सकाळी एका इसमाने एटीएम मध्ये घुसून चारही एटीएम मशिन वर दगड टाकून फोडले .
या एटीएम सेंटरमध्ये दोन सीडीएम ( कॅश भरणा ) व दोन एटीएम असून एटीएम फोडल्यानंतर आजूबाजूच्या ग्राहकांनी तात्काळ बँक अधिकारी व सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधला. या माथेफिरूला तात्काळ ताब्यात घेऊन पोलिसांना कळविण्यात आले .
लाखो रुपयांचे हे एटीएम मशीन असून पुढील कारवाई पोलीस घटनास्थळी दाखल होऊनराहुरी पोलिसांनी सदर इसमाला ताब्यात घेतले आहे .

Post a Comment
0 Comments